यशवंत पंचायत राज अंतर्गत जिल्हा परिषदेत तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:56 IST2021-02-05T06:56:26+5:302021-02-05T06:56:26+5:30

कोल्हापूर : यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्हा परिषदेची बुधवारी तपासणी करण्यात आली. संध्याकाळी कागल पंचायत ...

Investigation in Zilla Parishad under Yashwant Panchayat Raj | यशवंत पंचायत राज अंतर्गत जिल्हा परिषदेत तपासणी

यशवंत पंचायत राज अंतर्गत जिल्हा परिषदेत तपासणी

कोल्हापूर : यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्हा परिषदेची बुधवारी तपासणी करण्यात आली. संध्याकाळी कागल पंचायत समितीचीही तपासणी करण्यात आली असून, आज (गुरूवारी) गडहिंग्लज पंचायत समितीची तपासणी करण्यात येणार आहे.

जिल्हा परिषदेच्या समिती सभागृहात तपासणी पथकाचे प्रमुख पुणे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे यांचे स्वागत प्रकल्प संचालक डाॅ. रवी शिवदास यांनी केले तर पुणे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम. एस. घुले यांचे स्वागत मनिषा देसाई यांनी केले. ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरूण जाधव यांनी अन्य पथक सदस्यांचे स्वागत केले.

बुधवारी दिवसभरात समितीने जिल्हा परिषदेच्या १६ विभागांनी सादर केलेल्या प्रस्तावांची पडताळणी करून तपासणी केली. विविध योजना, उद्दिष्टपूर्ती, अंमलबजावणी, अभिलेख याबाबतीत तपासणी करण्यात आली. यावेळी विविध विभागप्रमुख उपस्थित होते.

०३०२२०२१ कोल झेड पी ०१

जिल्हा परिषदेच्या तपासणीसाठी आलेले भारत शेंडगे यांचे डॉ. रवी शिवदास यांनी स्वागत केले. यावेळी एम. एस. घुल, अरूण जाधव, मनिषा देसाई यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते.

Web Title: Investigation in Zilla Parishad under Yashwant Panchayat Raj