कोल्हापुरातील भारत राखीव बटालियनच्या समादेशकाची ७६ टक्के अपसंपदा, खुशाल सपकाळे याच्यासह पत्नीवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 13:28 IST2025-10-08T13:27:46+5:302025-10-08T13:28:08+5:30

मुंबईतून कारभार, तरीही कोटींची कमाई

Investigation reveals that Khushal Vitthal Sapkale commander of the Indian Reserve Battalion in Kolhapur, has acquired 75 percent of his wealth | कोल्हापुरातील भारत राखीव बटालियनच्या समादेशकाची ७६ टक्के अपसंपदा, खुशाल सपकाळे याच्यासह पत्नीवर गुन्हा

कोल्हापुरातील भारत राखीव बटालियनच्या समादेशकाची ७६ टक्के अपसंपदा, खुशाल सपकाळे याच्यासह पत्नीवर गुन्हा

कोल्हापूर : येथील भारत राखीव बटालियन क्रमांक तीनचा तत्कालीन समादेशक खुशाल विठ्ठल सपकाळे (रा. मरोळ, मुंबई) याने नोकरी करताना पगारापेक्षा ७५.९८ टक्के जादा म्हणजेच एक कोटी ६६ लाख ३३ हजार ९९१ रुपयांची अपसंपदा मिळवल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. याबाबत सपकाळे याच्यासह त्याची पत्नी हेमांगी यांच्यावर मंगळवारी (दि. ७) लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. एप्रिल २०१७ मध्ये बटालियनच्या कोल्हापुरातील कार्यालयात तो लाच घेताना सापडला होता. त्यानंतर त्याची चौकशी सुरू होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल २०१७ मधील कारवाईत भारत राखीव बटालियनचे तत्कालीन समादेशक सपकाळे याच्यासह सहा जणांना अटक झाली होती. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षकांनी सपकाळे याच्या मालमत्तेची खुली चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांनी चौकशी पूर्ण केली. चौकशीअंती सपकाळे याच्याकडे त्याचा पगार आणि अन्य अधिकृत स्रोतांपेक्षा ७५.९८ टक्के जास्त म्हणजे एक कोटी ६६ लाख ३३ हजार ९९१ रुपयांची अपसंपदा असल्याचे स्पष्ट झाले.

याबाबत उपअधीक्षक पाटील यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी सपकाळे दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला. पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलिस अधीक्षक अर्जुन भोसले अधिक तपास करीत आहेत. सपकाळे सध्या सेवानिवृत्त आहेत.

मुंबईतून कारभार, तरीही कोटींची कमाई

सपकाळे हा मुंबईत बसून बटालियनचा कारभार पाहत होता. आठवड्यातून एखादा दिवस येऊन तो कर्मचारी आणि दुय्यम अधिका-यांना कारवाया करण्याची भीती घालत होता. त्यावेळी घेतलेली पोलिस भरती आणि वर्ग चारच्या कर्मचारी भरतीत त्याने कोट्यवधी रुपये उकळल्याची चर्चा आहे. त्यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चौकशीतून तो सुटला होता. मात्र, लाच प्रकरणात अडकल्याने त्याची अपसंपदा समोर आली.

'पानकर'शी साटेलोटे?

पोलिसांच्या बदली प्रकरणात खंडणीचा गुन्हा दाखल असलेला पोलिस अधीक्षक कार्यालयातील आस्थापना प्रमुख संतोष पानकर हा २०१७ मध्ये भारत राखीव बटालियनमध्ये कार्यरत होता. त्यावेळी पानकर आणि सपकाळे या दोघांचे साटेलोटे होते. त्यामुळे पानकर याच्याही मालमत्तांची चौकशी होण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Web Title : कोल्हापुर: भारत रिजर्व बटालियन कमांडर की 76% अधिक संपत्ति; मामला दर्ज।

Web Summary : पूर्व कमांडर खुशाल सपकाले और पत्नी पर 1.66 करोड़ रुपये की आय से अधिक संपत्ति अर्जित करने का आरोप; आय से 76% अधिक। 2017 में रिश्वत लेते हुए पकड़े जाने पर जांच शुरू हुई और संपत्ति का खुलासा हुआ। पुलिस जांच जारी है।

Web Title : Kolhapur: India Reserve Battalion Commander amassed disproportionate assets; case filed.

Web Summary : Ex-commander Khushal Sapkale and wife face charges for amassing ₹1.66 crore disproportionate assets, 76% above income. He was caught taking bribes in 2017, leading to investigation and asset disclosure. A police investigation is underway.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.