शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बॅँकेच्या माजी संचालकांची चौकशी ठप्पच

By admin | Updated: August 25, 2015 00:19 IST

गैरव्यवहार : सहकारमंत्र्यांकडील चौकशी जैसे थे, मालमत्ता जप्तीची गर्जना करणारे युतीचे नेते गप्पच

राजाराम लोंढे ल्ल कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ४५ माजी संचालकांची चौकशी सहकार विभागाच्या पातळीवरच ठप्प झाली आहे. उच्च न्यायालाने ‘कलम ८८’च्या कारवाईला स्थगिती दिली असली तरी सहकार विभागाने पुढील कारवाई करणे अपेक्षित होती. माजी संचालकांच्या मालमत्ता जप्त करणारच, अशी भीमगर्जना करणारे युतीचे नेते गेले पाच महिने एकदम शांत कसे झाले? २८ मार्चला होणाऱ्या सुनावणीचे पुढे काय झाले. याबाबत सहकार क्षेत्रात सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहे. विनातारण व अल्पतारण कर्ज वाटप करून नुकसान केल्याप्रकरणी जिल्हा बँकेचे ४५ माजी संचालक व एक कार्यकारी संचालकांवर सहकार विभागाने ‘कलम ८८’ नुसार १४७ कोटींची जबाबदारी निश्चितीची कारवाई केली होती. जबाबदारी निश्चित केल्याप्रमाणे पैसे भरले नाहीत, तर मालमत्ता जप्तीच्या नोटिसा विभागीय सहनिबंधक राजेंद्र दराडे यांनी जानेवारी २०१५ मध्ये माजी संचालकांना काढल्या होत्या. याविरोधात तेरा संचालकांनी सहकारमंत्र्यांकडे अपील केले, पण दोषी संचालकांच्या मालमत्तेवर टाच आणण्याची सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी घोषणा केल्याने काही संचालकांनी थेट न्यायालय गाठले. त्यावर सुनावणी होऊन सहकारमंत्र्यांकडे अपील करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले. सहकारमंत्र्यांनी मालमत्ता जप्तीला स्थगिती देत मूळ कारवाईबाबत २८ मार्चला सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला. तोपर्यंत माजी संचालकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करत कारवाई बेकायदेशीर असल्याचे म्हणणे सादर केले. त्यावर सुनावणी होऊन ‘८८’ च्या कारवाईला स्थागिती देत सहकारमंत्र्यांनी दिलेले आदेश रद्दबातल ठरविल्याने माजी संचालकांचा जिल्हा बँक निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला होता. बॅँकेची निवडणूक होऊन चार महिने झाले, पण सहकारमंत्र्यांकडील सुनावणी पुढे सरकलीच नाही. राज्य पातळीवर सहकारात मिळेल त्या ठिकाणी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी करण्याची संधी युतीचे विशेषत: भाजपचे नेते सोडत नाहीत. स्वीकृत संचालकांच्या माध्यमातून सहकारात प्रवेश करून दोन्ही काँग्रेसच्या सत्तेवर नजर ठेवण्याचा प्रयत्न युतीचा आहे. मग जिल्हा बॅँकेच्या कारवाईच्या माध्यमातून आयत्या आलेल्या संधीचा फायदा न घेता युतीचे सरकार गप्प कसे झाले. हे सर्वसामान्यांना पडलेले कोडे आहे.