पाचगावातील पाईप लाईनच्या दुबार कामाची चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:17 IST2021-06-11T04:17:44+5:302021-06-11T04:17:44+5:30

कोल्हापूर : पाचगाव येथील अभिनव, अथर्व, पारिजात कॉलनीतील पाईपलाईनच्या दुबार कामाची चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे संतोष माळी यांनी ...

Investigate the double work of the Pachgaon pipeline | पाचगावातील पाईप लाईनच्या दुबार कामाची चौकशी करा

पाचगावातील पाईप लाईनच्या दुबार कामाची चौकशी करा

कोल्हापूर : पाचगाव येथील अभिनव, अथर्व, पारिजात कॉलनीतील पाईपलाईनच्या दुबार कामाची चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे संतोष माळी यांनी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे एका निवेदनाव्दारे केली.

निवेदनात म्हटले आहे, अमृत योजनेतून पाचगाव येथील अभिनव, अथर्व, पारिजात कॉलनीतील सुमारे दीड किलोमीटरच्या पाईपलाईन काम दोनवेळा केले. जानेवारी, फेब्रुवारीत या परिसरात एकदा पाईप लाईन टाकले. काही दिवसांतच पुन्हा टाकलेले पाईप काढून दुसरे बसवण्यात आले. अशाप्रकारे दुबार पाईपलाईन टाकण्यासाठी कोणी खर्च केला, असे करण्यामागचे नेमके कारण काय ? महापालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली नसताना एकच काम दोनवेळा करून निधीची अपव्यय केला आहे. याची चौकशी करावी. निवेदन देताना राजाराम नरके, संजय पोवार, संतोष पाटील, संदीप सुतार, रणजित साळोखे उपस्थित होते.

Web Title: Investigate the double work of the Pachgaon pipeline