शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
4
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
5
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
6
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
7
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
8
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
9
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
11
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
12
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
14
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
15
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
16
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
17
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
18
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
19
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
20
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

खासदारांचा नंबर काढणारी ही तर ‘आंतरराष्ट्रीय संस्था’

By admin | Updated: September 4, 2016 01:21 IST

महाडिक यांचा पलटवार : सतेज पाटील यांना दिले प्रत्युत्तर

कोल्हापूर : खासदारांचा नंबर काढणारी आंतरराष्ट्रीय संस्था आता कोल्हापुरात असल्याचा पलटवार खासदार धनंजय महाडिक यांनी शनिवारी केला. आमदार सतेज पाटील यांनी शुक्रवारी केलेल्या वक्तव्यावर ज्यांच्या बाबतीत ही टिप्पणी झाली होती, त्या खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीतच महाडिक यांनी परतफेड करून टाकली. शुक्रवारी सायंकाळी केशवराव भोसले नाट्यगृहात पाटील यांच्या एसपीएन या वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमासाठी स्वत. सतेज पाटील व खासदार संभाजीराजे उपस्थित होते. यावेळी सतेज पाटील यांनी कुणीही कितीही प्रश्न विचारले तरी राजे तुम्ही जनतेच्या मनातील एक नंबरचे खासदार आहात, नुसते प्रश्र्न मांडून उपयोग काय, त्यातील सुटले किती अशी टीका खासदार महाडिक यांचे नांव न घेता केली होती.त्याचवेळी संभाजीराजे यांचे मात्र तोंडभरून कौतुक केले होते. शनिवारी सकाळी शाहू स्मारक भवनमध्ये सराफ संघ व धातू प्रबोधिनीच्या कार्यक्रमात महाडिक व संभाजीराजे एकत्र होते. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे महाडिक यांनी या विषयाला हात घातला. ते म्हणाले, खासदार म्हणून निवडून आल्यानंतर जाणीवपूर्वक प्रभावीपणे काम केले, म्हणूनच प्टॉप थ्री खासदारांमध्ये निवड झाली. ही निवड देशपातळीवरील संस्थेने केलेल्या मूल्यांकनातून झाली आहे. मात्र, संभाजीराजेंना कालच एक नंबरचा खासदार म्हणून घोषित करण्यात आले. त्यांचे मूल्यांकन करणारी आंतरराष्ट्रीय संस्था कोल्हापुरातील आहे, असा टोला सतेज पाटील यांचे नाव न घेता महाडिक यांनी यावेळी लगावलाकेशवराव भोसले शुक्रवारी नाट्यगृहात आमदार सतेज पाटील यांनी खासदार संभाजीराजे यांचे कौतुक करताना अप्रत्यक्षपणे धनंजय महाडिक यांच्यावर टीका केली होती, तर त्याला प्रत्युत्तर देताना महाडिक यांनी शनिवारी आमदार सतेज पाटील यांच्यावरही अप्रत्यक्षपणे टीका केली. त्यांनीही संभाजीराजे यांची काम करण्याची धडपड चांगली असल्याचीही पुस्ती त्यांनी जोडली.