शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिक प्रकल्पाची वानवा

By admin | Updated: October 5, 2014 23:08 IST

शाहूवाडी तालुका : नुसती आश्वासने, प्रकल्प कागदावर रखडले

राजाराम कांबळे -मलकापूर -शाहूवाडी तालुक्यात औद्योगिक प्रकल्पाची वानवा आहे. कोणत्याही राजकीय लोकप्रतिनिधींनी तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून दिला नाही. पोटाची खळगी भरण्यासाठी तरुणांना मुंबई-पुण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. आजअखेर तालुक्याला आश्वासनापलीकडे काहीच मिळाले नाही. आश्वासनाचे प्रकल्प कागदावर रखडले आहेत. दहा ते पंधरा वर्षांपूर्वी शासनाने प्रत्येक तालुक्याला दूध संघ देण्याचा धोरणात्मक निर्णय झाला होता. दूध महापूर योजनेला गती मिळावी व उत्पादकांना उत्पादन खर्चावर आधारित दर देणे सुलभ व्हावे तसेच शेतीला पूरक असा हा व्यवसाय अधिक वृद्धिंगत व्हावा हा त्यामागील उद्देश होता. तालुक्यातील माजी आमदार बाबासाहेब पाटील-सरुडकर, करणसिंह गायकवाड, मानसिंगराव गायकवाड यांनी प्रस्ताव दाखल केले. दोन्ही गायकवाडांची दिलजमाई झाल्याने उदय सहकारी दूध संघाचे नेतृत्व करणसिंह गायकवाड यांचेकडे आले. राज्यातील सर्वच जिल्हा दूध संघांनी या निर्णयाला उच्च न्यायालयात स्थगिती मिळविली. त्यामुळे दूध संघ कागदावर राहिला.सर्वच प्रकारच्या खेळाचे सखोल मार्गदर्शन व्हावे, त्यातून राष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी शासनाच्या क्रीडा व युवक सेवा विभागाने सन २००१ मध्ये तालुक्याला क्रीडा संकुलनाचा निर्णय जाहीर झाला. तत्कालीन माजी आमदार श्रीमती संजीवनी गायकवाड यांनी २००३ला बांबवडे येथे क्रीडा संकुलनाची मंजुरी मिळविली. बांबवडे ग्रामपंचायतीने चार एकर जागा देऊन या कामाचे २००६ला माजी आमदार सत्यजित पाटील, करणसिंह गायकवाड यांच्या उपस्थितीत कामाचा प्रारंभ करण्यात आला. पंचवीस लाख रुपये खर्चाचा पहिला दहा लाखांचा हप्ता खर्ची पडला. यामध्ये उर्वरित कामे देखील झाली. मात्र अद्याप बरीच कामे अपूर्ण आहेत.माजी आमदार बाबासाहेब पाटील यांनीदेखील बजागेवाडी येथे सहकारी तत्त्वावर सूतगिरणीसाठी जोरदार प्रयत्न केले. मात्र, यावेळी विरोधी पक्षाचे सरकार असल्याने त्यांना देखील या कामात यश मिळाले नाही. अखेर सूतगिरणी कागदावरच राहिली आहे. मानसिंगराव गायकवाड यांनी तालुक्यात साखर कारखाना काढला मात्र, कारखान्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. शाहूवाडी तालुक्याची पुनर्रचना घेऊन शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघ २००९ला निर्माण झाला. निवडणुकीदरम्यान आमदार विनय कोरे यांनी शाहूवाडीत बॉक्साईटपासून तुरटी प्रकल्प, वारुळ येथे गाईचा गोठा प्रकल्प, अशी आश्वासने जनतेला दिली होती. मात्र, पाच वर्षे झाली तरी हे प्रकल्प कागदावरच राहिले आहेत.येथील लोकप्रतिनिधींनी जनतेला आश्वासनापलीकडे काहीच दिलेले नाही. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आपल्या गटाचा आमदार होण्यासाठी कार्यकर्ते गावा-गावांतील जनतेला आश्वासनांचा पाऊस पाडत आहेत. मात्र, निवडणूक संपली की पाच वर्षे लोकप्रतिनिधी सर्वसामान्य नागरिकांकडे फिरकत नाहीत. एम.आय.डी.सी. जागेवरून वादमाजी आमदार श्रीमती संजीवनी गायकवाड यांनी वारुळ येथे मिनी एम.आय.डी.सी. मंजूर करून घेतली होती. मात्र, एम.आय.डी.सी. ही वारुळ की बांबवडे येथे, यावरून वाद निर्माण झाला. अखेर ही मिनी एम.आय.डी.सी. कागदावरच राहिली. दुसऱ्या गटाचे काम कसे बंद पडेल, आपला गट मोठा कसा होईल, याचाच फायदा राजकीय मंडळींनी घेतला आहे.