शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
4
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
5
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
6
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
7
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
8
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
9
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
10
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
11
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
12
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
13
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
14
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
15
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
16
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
17
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
18
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
19
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
20
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
Daily Top 2Weekly Top 5

करवीरमध्ये प्रस्थापित संचालक बदलाचे संकेत...

By admin | Updated: January 20, 2015 00:02 IST

निवडणुकीचे पडघम : गगनबावडा व पन्हाळ्याला संधीची शक्यता; ज्यांच्याकडे ठराव त्याला मिळणार प्राधान्य

प्रकाश पाटील - कोपार्डे= ‘गोकुळ’ दूध संघावर नेहमीच करवीरचा दबदबा आहे. यात मनपा लॉबी तयार झाल्यानंतर काही विशिष्ट व्यक्ती, भाग व नेत्यांच्या नातेवाइकांमध्येच ‘गोकुळ’च्या संचालकपदाची मक्तेदारी राहिली आहे. त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी कधी? असा प्रश्न कार्यकर्त्यांतून विचारला जात आहे. त्यामुळे गेली १५ ते २० वर्षे ‘गोकुळ’च्या संचालकपदावर असणाऱ्यांना पायउतार करून करवीरमध्ये भाकरी परतणार काय? याबाबत उत्सुकता वाढली आहे.‘गोकुळ’च्या संचालकपदासाठी नेत्यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते जरी बनलो, तरी संधी मिळू शकेल ही भावना कार्यकर्त्यांत रुजली आहे. लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिक, तर विधानसभेवेळी पी. एन. पाटील यांच्यासाठी गोकुळच्या संचालकपदासाठी इच्छुक असणाऱ्या कार्यकर्त्यांनी जिवाचे रान केले होते. तरी निवडणुकीत नेत्यांना मदत केल्याची बेरीज-वजाबाकी मांडून आपण गोकुळसाठी इच्छुकांबरोबर दावेदार असल्याचे गणित बिगुल वाजल्यापासून कार्यकर्ते मांडत आहेत.करवीरमध्ये असणाऱ्या पाच संचालकांत बाबासाहेब चौगले यांचा पत्ता सतेज पाटलांनी शड्डू ठोकल्याने कट होणार आहे. आनंदराव पाटील (चुयेकर) यांच्या ठिकाणी त्यांचे पुत्र शशिकांत पाटील, विश्वास नारायण पाटील यांच्या जागा निश्चित असून निवास पाटील यांचे पुत्र उत्तम पाटील, की पी. एन. पाटील यांचे पुत्र राजेश पाटील हे लवकरच होणाऱ्या मेळाव्यात ठरणार असल्याची कार्यकर्त्यांत चर्चा आहे. सुरेश पाटील गेली दहा वर्षे ठाण मांडून असल्याने आता दुसऱ्याला संधी मिळावी, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. त्यामुळे येथे बदलाची मोठी शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे पाच संचालकांमध्ये विश्वास पाटील व शशिकांत पाटील (चुयेकर) यांची उमेदवारी निश्चित समजली तरी बाकी तीन जागांवर भाकरी परतणार अशीच चिन्हे सध्या दिसत आहेत.यात एस. के. पाटील (कोपार्डे), प्रकाश पाटील (कोगे), तुकाराम दत्तात्रय पाटील (खुपिरे), बाळासाहेब खाडे (सांगरूळ) यांची नावे आघाडीवर आहेत. यातही संस्थांचे ठराव गोळा करण्यात कोण आघाडीवर आहे, त्यालाच प्राधान्यक्रम दिला जाण्याची मोठी शक्यता आहे. करवीर मतदारसंघातील पन्हाळ्यामध्ये अ‍ॅड. प्रकाश देसाई यांनी पी. एन. पाटील यांच्या बाजूने राहत नरकेंच्या विरोधात किल्ला लढविला. तेही गोकुळसाठी फिल्डिंग लावून आहेत. त्यातच पन्हाळ्यात नरकेंच्या विरोधात एक दमदार गट निर्माण करण्यासाठी अ‍ॅड. प्रकाश देसाई यांचे नावही पुढे येण्याची शक्यता आहे.कार्यकर्ते राजेश यांच्यासाठी आग्रहीपी. एन. पाटील यांनी राजेशला पुढे आणावे यासाठी येत्या चार दिवसांत कार्यकर्तेच मेळावा बोलावणार असल्याचे खात्रिशीर वृत्त आहे. यात पी. एन. पाटील यांच्यावर गोकुळमध्ये राजेशला संधी देऊन आगामी राजकारणासाठी पुढे करावे यासाठी कार्यकर्त्यांतूनच दबाव टाकला जाणार आहे.