शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

शित्तूर - वारुण येथे दिशादर्शक फलक नसल्याने गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:26 IST

शित्तूर-वारूण या गावातून परिसरात प्रसिद्ध असलेल्या उदगिरी देवस्थान, उखळू व तुरुकवाडी या गावांबरोबरच शिराळा तालुक्यातील आरळा या बाजारपेठेच्या ठिकाणी ...

शित्तूर-वारूण या गावातून परिसरात प्रसिद्ध असलेल्या उदगिरी देवस्थान, उखळू व तुरुकवाडी या गावांबरोबरच शिराळा तालुक्यातील आरळा या बाजारपेठेच्या ठिकाणी जाण्यासाठी मुख्य रस्ते आहेत.

उदगिरी या गावामध्ये कालिकामातेचे मंदिर असून अनेक भाविक भक्तांचे ते श्रद्धास्थान आहे. मुंबई, पुणे, कराड, सांगली आदी ठिकाणांहून येणाऱ्या भाविकांना उदगिरीला जाण्यासाठी आरळा-शित्तूर हा सोयीचा रस्ता असल्यामुळे या मार्गावरुन जास्तीत-जास्त लोक प्रवास करतात. परंतु शित्तूर-वारूण या ठिकाणी उदगिरी होऊन येताना किंवा उदगिरीकडे जाताना आरळा, उखळू, तुरुकवाडी किंवा उदगिरी असा दिशादर्शक फलक नसल्यामुळे वाहनचालकांत संभ्रम निर्माण होतो आणि प्रवाशी शिराळे-खेडे किंवा आरळा-चरण या गावाकडे जातात आणि पुढे जाऊन चौकशी केल्यानंतर माघारी फिरून परत उदगिरी किंवा आरळ्याकडे जातात.

सध्या या रस्त्यावर वाहनांची रहदारी फारच वाढलेली आहे. रात्री-अपरात्री रस्ता शोधणे मुश्कील झाले आहे. त्यातच उदगिरीहून येणारा रस्ता उतरंडीच्या वळणाचा असल्यामुळे रस्ता शोधण्याच्या प्रयत्नात अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या ठिकाणी संबंधित प्रशासनाने त्वरित दिशादर्शक फलक लावावेत अशी मागणी प्रवासी, वाहनधारकांसह ग्रामस्थांकडून होत आहे.

फोटो:

शित्तूर-वारुण (ता. शाहुवाडी) येथील या ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्याची वाहनधारकांकडून मागणी होत आहे. (छाया-सतीश नांगरे)