शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

आजऱ्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:25 IST

आजरा : आजरा तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. २१ दिवसांत २४८ नागरिक बाधित झाले असून ७ जणांचा मृत्यू ...

आजरा : आजरा तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. २१ दिवसांत २४८ नागरिक बाधित झाले असून ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तालुक्यातील ८ ते १० गावे हॉटस्पॉट बनली असल्याने तालुक्यातील सर्वच गावांमध्ये बाहेरच्या नागरिकांना प्रवेश बंदी केली आहे. लग्न, वाढदिवस व अन्य कार्यक्रमांवर निर्बंध घातले आहेत. कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यापासून १ एप्रिल २०२१ नंतर २१ दिवसांत तालुक्यात २४८ नागरिक बाधित आढळले असून ७ जणांचा मृत्यू झाला आहे. ९६ नागरिकांवर घरी उपचार, ३१ जणांवर गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालय, ९ जणांवर खासगी हॉस्पिटल तर १ सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. तर आजऱ्यातील कोविड सेंटरमध्ये ७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सध्या उपचारानंतर ३० जणांना घरी पाठविण्यात आले आहे.

गावागावात येणारे चाकरमानी, लग्नसमारंभ, वाढदिवस यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तालुक्यात भादवण, महागोंड, सुळे, कानोली, उत्तूर, चव्हाणवाडी, पेरणोली, लाटगाव या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडल्याने भीतीचे वातावरण आहे. या गावांमध्ये बाहेरच्यांना प्रवेश बंदी केली आहे. पुणे व मुंबईसह अन्य ठिकाणांहून येणाऱ्या चाकरमान्यांना कोरोनाचा अहवाल दाखविल्याशिवाय गावामध्ये प्रवेश दिला जात नाही.

चौकट : शेतीकामावर जाण्यासही वेळेचे निर्बंध

तालुक्यातील अनेक गावांनी वैद्यकीय सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवले आहेत. भादवण येथे सकाळी ७ नंतर शेतीची कामे करण्यासाठी बाहेर जाण्यास तर सायंकाळी सहानंतर घरी येण्यास परवानगी दिली आहे. भाजीपाला-फेरीवाले यांना सर्वच गावातून बंदी घातली आहे.

आजरा शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची तातडीने कोरोनाची अ‍ॅंटिजेन टेस्ट घेतली जाते. त्यामुळे अनेकांनी घरीच थांबणे पसंत केले आहे. मास्क नसेल तर ५०० रुपये दंड व विनाकारण फिरत असेल कोरोनाच्या टेस्टला सामोरे जावे लागत आहे.

शहरामधील सर्व गल्ल्यांमध्ये औषधांची फवारणी सुरू आहे.