मुरगूडमध्ये बहुजन जनजागृती संस्थेचे उद्‌घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:31 IST2020-12-30T04:31:55+5:302020-12-30T04:31:55+5:30

संस्थेच्या स्थापना फलकाचे उद्‌घाटन सत्यशोधक प्रबोधन महासभा महाराष्ट्रचे अध्यक्ष टी. एस. पाटील यांचे हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुरगूडचे ...

Inauguration of Bahujan Janajagruti Sanstha in Murgud | मुरगूडमध्ये बहुजन जनजागृती संस्थेचे उद्‌घाटन

मुरगूडमध्ये बहुजन जनजागृती संस्थेचे उद्‌घाटन

संस्थेच्या स्थापना फलकाचे उद्‌घाटन सत्यशोधक प्रबोधन महासभा महाराष्ट्रचे अध्यक्ष टी. एस. पाटील यांचे हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुरगूडचे नगराध्यक्ष राजेखान जमादार होते. सामंत पुढे म्हणाले , लोकशाहीचे संवर्धन होणेसाठी बहुजन समाजात जागृती होणे आवश्यक आहे. यासाठी शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचार मार्गावर समाजाची वाटचाल होण्यासाठी चळवळीत क्रियाशीलता यावी यासाठी अशा संस्थेची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष जोतीराम सूर्यवंशी, उपाध्यक्ष कॉ. संतराम पाटील, वृक्षमित्र प्रवीण सूर्यवंशी, शिवाजीराव कांबळे , कॉ. अशोक चौगले , प्रदीप वर्णे, दत्तामामा खराडे, नंदकुमार मोरे, किरण गवाणकर, नगरसेवक सुहास खराडे, रवींद्र परीट, संदीप कलकुटकी, राहुल वंडकर, नगरसेविका प्रतिभा सूर्यवंशी, सुप्रिया भाट, रंजना मंडलिक आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत प्रास्ताविक प्रवीण सूर्यवंशी तर आभार भैरवनाथ डवरी यांनी मानले.

फोटो ओळ -

मुरगूड (ता. कागल) येथे बहुजन जनजागृती बहुउद्देशीय संस्थेच्या उद्‌घाटनप्रसंगी सत्यशोधक प्रबोधनचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील, संस्थापक एम. टी. सामंत, नगराध्यक्ष राजेखान जमादार, जोतीराम सूर्यवंशी आदी मान्यवर.

Web Title: Inauguration of Bahujan Janajagruti Sanstha in Murgud