शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

व्हिडीओ गेम पार्लरवर छापे

By admin | Updated: November 25, 2015 01:01 IST

दीडशे जणांना अटक : लाखोंची रोकड जप्त; कोल्हापुरात कारवाई

कोल्हापूर : शहरात लक्ष्मीपुरी, शाहूपुरी व जुना राजवाडा परिसरातील तीन व्हिडीओ गेम पार्लरवर पोलिसांनी मंगळवारी रात्री छापे टाकले. यावेळी जुगार खेळणाऱ्या सुमारे दीडशेपेक्षा जास्त तरुणांना ताब्यात घेऊन अटक केली. यावेळी पोलिसांनी तिन्ही ठिकाणांहून लाखोंची रोकड जप्त केली. अप्पर पोलीस अधीक्षक एस. चैतन्या यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईनंतर शहरातील बहुतांश व्हिडीओ पार्लर बंद करण्यात आले. शहरातील काही व्हिडीओ गेम पार्लरमध्ये हद्दीतील पोलीस ठाण्यांच्या आशीर्वादाने राजरोसपणे जुगार सुरू असल्याची तक्रार अप्पर पोलीस अधीक्षक एस. चैतन्या यांच्याकडे नागरिकांनी केली होती.त्यानुसार चैतन्या यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला घेऊन मंगळवारी रात्री एकाच वेळी लक्ष्मीपुरी, शाहूपुरी व जुना राजवाडा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सुरू असलेल्या व्हिडीओ पार्लरवर छापे टाकले. अचानक पडलेल्या छाप्यांनी जुगार खेळणारे भांबावून गेले. दरम्यान, आपल्या हद्दीत छापे पडल्याची चाहूल लागताच तिन्ही पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक चैतन्या यांनी संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रमुखांना व्हिडीओ पार्लरचे मालक, कर्मचारी व जुगार खेळणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करून अटक करण्याचे आदेश दिले. त्यानुसार रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. या कारवाईने शहरातील व्हिडीओ गेम पार्लर मालकांचे धाबे दणाणले आहेत. कारवाईनंतर घटनास्थळी शहर पोलीस उपअधीक्षक भारतकुमार राणे यांनी भेट दिली. (प्रतिनिधी) ‘लक्ष्मीपुरी’चे प्रवेशद्वार केले बंद लक्ष्मीपुरी हद्दीतील क्लासिक व्हिडीओ गेम पार्लरमध्ये रात्री साडेनऊच्या सुमारास स्वत: अप्पर पोलीस अधीक्षक एस. चैतन्या यांनी छापा टाकला. यावेळी पार्लरमध्ये सुमारे ४० तरुण जुगार खेळत असताना मिळून आले. पोलिसांचा फौजफाटा पाहून या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी गर्दी केल्याने काही काळ वाहतूक विस्कळित झाली. त्यानंतर संशयित आरोपींना लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात आणले. याठिकाणी आरोपी व त्यांच्या नातेवाईक व मित्रपरिवाराची गर्दी झाल्याने गोंधळ उडाला. गर्दीचा फायदा घेत संशयित पळून जातील म्हणून पोलिसांनी नातेवाइकांना पिटाळून लावत पोलीस ठाण्याचा दरवाजा बंद करून घेतला. मध्यरात्रीपर्यंत हा दरवाजा बंद होता. आतमध्ये आरोपींचे जाबजबाब घेण्याचे काम सुरू होते. मित्रपरिवार व नातेवाईक पुन्हा पोलीस ठाण्यासमोर येऊन आपल्या आप्तेष्टांची प्रतीक्षा करीत होते.‘लक्ष्मीपुरी’चे प्रवेशद्वार केले बंद लक्ष्मीपुरी हद्दीतील क्लासिक व्हिडीओ गेम पार्लरमध्ये रात्री साडेनऊच्या सुमारास स्वत: अप्पर पोलीस अधीक्षक एस. चैतन्या यांनी छापा टाकला. यावेळी पार्लरमध्ये सुमारे ४० तरुण जुगार खेळत असताना मिळून आले. पोलिसांचा फौजफाटा पाहून या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी गर्दी केल्याने काही काळ वाहतूक विस्कळित झाली. त्यानंतर संशयित आरोपींना लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात आणले. याठिकाणी आरोपी व त्यांच्या नातेवाईक व मित्रपरिवाराची गर्दी झाल्याने गोंधळ उडाला. गर्दीचा फायदा घेत संशयित पळून जातील म्हणून पोलिसांनी नातेवाइकांना पिटाळून लावत पोलीस ठाण्याचा दरवाजा बंद करून घेतला. मध्यरात्रीपर्यंत हा दरवाजा बंद होता. आतमध्ये आरोपींचे जाबजबाब घेण्याचे काम सुरू होते. मित्रपरिवार व नातेवाईक पुन्हा पोलीस ठाण्यासमोर येऊन आपल्या आप्तेष्टांची प्रतीक्षा करीत होते.