शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

‘शाहूं’चा मद्रास चळवळीवर प्रभाव

By admin | Updated: December 19, 2014 23:22 IST

पद्मजा पाटील यांचे संशोधन : संदर्भ ग्रंथाचे आज प्रकाशन

कोल्हापूर : छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या सामाजिक कार्याने केवळ स्थानिक किंवा राज्यस्तरीयच नव्हे, तर मद्रास प्रांतातील जस्टीस पार्टीची चळवळही प्रभावित झाली होती. संबंधित बाब सप्रमाण सिद्ध करण्यात शिवाजी विद्यापीठाच्या संशोधक डॉ. पद्मजा पाटील यांना यश आले आहे. त्याबाबतच्या संशोधनातून इतिहास अधिविभागातील डॉ. पाटील यांनी ‘अस्तित्वासाठी संघर्ष, जातिवर्चस्व आणि दक्षिणेतील ब्राह्मणेतर चळवळ : संदर्भ साधनांचा अभ्यास’ हा संदर्भग्रंथ तयार केला आहे.या ग्रंथाचे प्रकाशन उद्या, शनिवारी शाहू सांस्कृतिक भवनातील दक्षिण भारत जैन सभेच्या ९४ व्या त्रैमासिक अधिवेशनात शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांच्या हस्ते होणार आहे. ग्रंथामध्ये डॉ. पाटील यांनी मूळ कागदपत्रांंसह अनेक उपयुक्त संदर्भ साधनांचा सर्वंकष आढावा घेतला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने मान्य केलेल्या मेजर रिसर्च प्रोजेक्ट अंतर्गत हे संशोधन डॉ. पाटील यांनी आॅगस्ट २०११ मध्ये पूर्ण केले. या ग्रंथाबद्दल डॉ. पाटील म्हणाल्या, ब्राह्मणेतर चळवळ ही सत्यशोधक व दलित, आंबेडकरी चळवळींमधील महत्त्वपूर्ण दुवा असल्याचे ग्रंथात प्रथमच सिद्ध केले आहे. एकूण पाच प्रकरणांत ग्रंथ विभागला आहे. त्यात उद्दिष्ट्ये व लेखनपद्धती, मुंबई व मद्रास इलाख्यातील ब्राह्मणेतर चळवळीचा साद्यंत इतिहास, तसेच संदर्भ साधनांची चर्चा केली आहे. त्यामध्ये दिल्ली, चेन्नई, केरळ, कोलकता येथील प्रमुख पुराभिलेखागारांमधील मूळ संदर्भ साधने, तसेच खासगी संग्रहालयातील कागदपत्रांचा आढावा घेतला आहे. तमिळ, मल्याळी, कन्नड, तेलगू संदर्भसाहित्य इंग्रजीमध्ये भाषांतरित करण्यासाठी ए. चंद्रशेखरन, मोहंमद कोया, जी. प्रेमकुमार यांचे सहकार्य लाभले आहे. तसेच राजर्षी शाहूंच्या कार्याविषयी मद्रास आणि त्रिवेंद्रम येथील वृत्तपत्रांतून आलेले संदर्भ तसेच मद्रास, महाराष्ट्रातील नेत्यांमधील पत्रव्यवहार हे ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे. (प्रतिनिधी)या संदर्भग्रंथाद्वारे डॉ. गेल आॅम्व्हेट आणि डॉ. के. के. कावळेकर यांच्या ब्राह्मणेतर चळवळी संदर्भातील संशोधनाला पद्मजा पाटील यांनी पुढे नेले आहे. त्याला सर्वंकषतेचे नवे आयाम प्राप्त करून दिले आहेत. - प्रा. डॉ. वासंती रासम, राज्यशास्त्र अधिविभाग