बेकायदेशीर देशी दारू विक्रीप्रकरणी छापे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:28 IST2021-09-21T04:28:02+5:302021-09-21T04:28:02+5:30

कोल्हापूर : बेकायदेशीर देशी दारू विक्रीप्रकरणी शाहुपुरी पोलिसांनी वेगवेगळ्या चार ठिकाणी छापे टाकून सुमारे १८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ...

Impressions are gained in a fluid, global, diffused way | बेकायदेशीर देशी दारू विक्रीप्रकरणी छापे

बेकायदेशीर देशी दारू विक्रीप्रकरणी छापे

कोल्हापूर : बेकायदेशीर देशी दारू विक्रीप्रकरणी शाहुपुरी पोलिसांनी वेगवेगळ्या चार ठिकाणी छापे टाकून सुमारे १८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

सदर बाजारमध्ये पोलिसांनी छापा टाकून बेकायदेशीर देशी दारू विक्री करताना काळू बसाप्पा कोळी (वय ४५ रा. कोरगावकर शाळेनजीक, सदर बाजार) याला पकडले, त्याच्याकडून १११० रुपयेची दारू जप्त केली. त्याच्यावर गुन्हा नोंदवला. तर स्टेशन रोडवरील छाप्यात मारुती शिवाजी सोनवणे (३५ रा. सदर बाजार) याच्यावर गुन्हा नोंदवला असून, त्याच्या ताब्यातून १७७६ रुपयेची देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील छाप्यात सुनील पंडितराव येडके (वय ४१ रा. विचारेमाळ) याच्यावर गुन्हा नोंदवला, त्याच्याकडून १५९२ रुपयेचा मुद्देमाल जप्त केला. कसबा बावडा येथील भगवा चौकात टाकलेल्या छाप्यात मनोज आनंदा सुतार (४० रा. संकपाळनगर, कसबा बावडा) याच्यावर गुन्हा नोंदवला, त्याच्या ताब्यातून सुमारे १३ हजार २९० रुपये किमतीच्या देशी दारूच्या बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या.

Web Title: Impressions are gained in a fluid, global, diffused way