शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
3
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
4
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
6
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
9
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
10
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
11
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
12
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
13
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
14
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
15
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
16
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
17
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
18
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
19
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
20
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय कृषी विकास याेजनेंतर्गत क्षारपड जमीन दुरुस्ती योजना राबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात क्षारपड जमिनीचे प्रमाण वाढत असून ही जमीन पिकाखाली आणण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात क्षारपड जमिनीचे प्रमाण वाढत असून ही जमीन पिकाखाली आणण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत क्षारपड जमीन दुरुस्ती योजना सुरू करावी, अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून ठिबकला प्रोत्साहन देण्यासाठी ठिबक ऑटोमायझेशनला अनुदान द्यावे, असेही त्यांनी सांगितले.

मंत्री भुसे शुक्रवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी ही मागणी केली. यावेळी माजी आमदार डाॅ. सुजीत मिणचेकर, जिल्हा प्रमुख विजय देवणे, संजय पवार उपस्थित होते.

राज्य शासनाने थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतीराव फुले शेतकरी सन्मान योजना आणली. त्याचा लाभ राज्यातील लाखो शेतकऱ्यांना झाला. त्याचवेळी नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर अनुदानाची घोषणा केली होती, त्यानुसार शेतकऱ्यांना ५० हजार रुपये अनुदान द्यावे, त्याचबरोबर जुलै व ऑगस्ट २०१९ मध्ये अतिवृष्टी व महापुराने नुकसान अद्याप काहींना मिळालेले नाही. त्याबाबतही आपल्या स्तरावरून कार्यवाही व्हावी, अशी मागणी खासदार माने यांनी मंत्री भुसे यांच्याकडे केली.

फोटो ओळी : क्षारपड जमीन दुरुस्तीसह इतर मागण्यांचे निवेदन खासदार धैर्यशील माने यांनी शुक्रवारी कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, सुजीत मिणचेकर उपस्थित होते. (फाेटो-०९०४२०२१-कोल-माने)