शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

टाकाळा खणीचे पुनर्भरण लवकरच

By admin | Updated: November 26, 2015 00:31 IST

‘झूम’मधील डोंगर हटणार : कचरा विल्हेवाटीचा प्रश्न सुटण्यास मदत

कोल्हापूर : शहरातील कचरा उठावाबरोबरच आता झूम प्रकल्पावर साचून राहिलेला आणि विघटन न होणाऱ्या (इनर्ट मटेरियल) कचऱ्याची शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच विघटन न होणाऱ्या कचऱ्याद्वारे टाकाळा येथील खणीचे पुनर्भरण करण्यात येणार आहे. शास्त्रशुद्ध पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावणारा हा कोल्हापुरातील पहिलाच प्रयोग असल्याने तो यशस्वी करण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे. शहरात दररोज १६० ते १७० टन कचरा निर्माण होत असून, त्याची विल्हेवाट कशाप्रकारे लावावी, हा गहन प्रश्न मनपा आरोग्य विभागासमोर आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने टोप येथील मोठी खण राज्य सरकारकडून मालकी हक्काने मिळविली; परंतु त्यास स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र विरोध केल्याने आणि हे प्रकरण हरित लवाद तसेच सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेल्याने कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे तोपर्यंत मध्य मार्ग म्हणून शहरातीलच टाकाळा खणीची जागा घेण्यात आली आहे. याही खणीत कचरा टाकण्यास स्थानिकांचा विरोध होता. त्यासाठी आंदोलनही झाले. काही गोष्टींची हमी दिल्यानंतर आंदोलन थांबविले गेले. आता टाकाळा खणीत विघटन न होणारा कचरा टाकला जाणार आहे. त्यासाठी संपूर्ण खणीभोवती सिमेंटची भिंत उभी करण्यात आली आहे. या खणीत कचरा टाकण्यापूर्वी विशिष्ट प्रकारचे बेड तयार करण्यात येणार आहेत. तसेच त्यातून काही प्रसंगी गॅस तयार झाला तर तो बाहेर पडण्यासाठी पाईप टाकल्या जाणार आहेत. कचऱ्याचा एक थर झाल्यानंतर त्यावर मुरुमाचा थर अंथरण्यात येऊन त्यावर रोलिंग केले जाणार आहे. त्यामुळे खणीचे पुनर्भरण व्यवस्थित होण्यास मदत होईल. पुनर्भरण प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी करावी लागणारी अनुषंगिक कामे सध्या सुरू असून, ती अंतिम टप्प्यात आहेत. कसबा बावड्यालगत असलेल्या झूम प्रकल्पावर सुमारे चार लाख टन कचरा साचून राहिला असून, त्यातील सुमारे दोन ते अडीच लाख टन कचरा हा विघटन न होणारा, तसेच पुनर्भरणास योग्य असलेला कचरा आहे.