ई-फार्मसीद्वारे विक्री बेकायदेशीर

By Admin | Updated: July 7, 2015 01:11 IST2015-07-07T01:11:21+5:302015-07-07T01:11:21+5:30

जगन्नाथ शिंदे : लोकांच्या जिवाशी खेळ

Illegal sale through e-pharmacy | ई-फार्मसीद्वारे विक्री बेकायदेशीर

ई-फार्मसीद्वारे विक्री बेकायदेशीर

कोल्हापूर : ई-फार्मसी हा बेकायदेशीर व्यवसाय असून, सध्याचे कायदे ई-फार्मसी चालविण्याची परवानगी देत नसल्याचे मत आॅल इंडिया आॅर्गनायझेशन आॅफ केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्टचे (एआयडीओ) अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.
त्यांनी पत्रकात म्हटले आहे की, सध्या आॅनलाईन फार्मसीज प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या औषध कायद्यांकडून प्रतिबंधित असलेल्या औषधांचा पुरवठा दिलेल्या कायद्यांचे पालन न करता करतात. एकीकडे सरकार नार्कोटिक आणि सायकोट्रॉपिक घटकांचा वापर असलेल्या औषधांचा तसेच अँटिबायोटिक्सचा गैरवापर टाळण्यासाठी नवीन नियम व नियमावली आणत आहे. त्यावेळी ही औषधे या आॅनलाइन फार्मसींमध्ये मुक्तपणे उपलब्ध असतील.
औषधांची विक्री कोणत्याही नियम तसेच नियंत्रणाविना केल्याने सार्वजनिक आरोग्यासाठी ती धोकादायक ठरू शकतात. ‘ई फार्मसी बिझनेस मॉडेल’ला या परिस्थितीत परवानगी देणे धोकादायक ठरेल. काही संस्थांच्या केवळ व्यापारी नफ्यासाठी सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षिततेसोबत खेळ केल्यासारखे होईल. एआयओसीडी मागणी करते, की डीसीजीने (आय) इंटरनेट औषध व्यापाराबाबत भेदभावरहित भूमिका घेण्यापासून थांबवण्याबाबत सूचना देणे तसेच लोकांना त्याच्या शक्य असलेल्या धोक्यांपासून सुरक्षित ठेवणे आवश्यक असल्याचे शिंदे म्हणाले.

Web Title: Illegal sale through e-pharmacy