शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

इंचनाळ देवस्थान जमिनीचा वहिवाटदार नेमा

By admin | Updated: December 12, 2015 00:10 IST

‘स्वाभिमानी’ची मागणी : जिल्हाधिकारी, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला निवेदन; आंदोलन छेडण्याचा इशारा

गडहिंग्लज : इंचनाळ (ता. गडहिंग्लज) येथील श्री गणपती देवाच्या जमिनीसाठी वहिवाटदार त्वरीत नेमावा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि इंचनाळ ग्रामस्थ व भाविकांनी जिल्हाधिकारी आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला दिलेल्या निवेदनातून दिला आहे.इंचनाळ येथील देवस्थान जमिनीच्या बेकायदेशीर खरेदी-विक्री व्यवहाराच्या विरोधात ग्रामस्थ आणि भाविकांनी येथील प्रांताधिकारी यांचेकडे तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीच्या सुनावणीअंती सहा वर्षांपूर्वी झालेली बेकायदेशीर फेरफार नोंद रद्द करण्याचा आदेश प्रांताधिकाऱ्यांनी दिला आहे. निवेदनात म्हटले आहे, इंचनाळ येथील जागृत देवस्थान व प्राचीन स्वयंभू गणपती देवस्थानाची पूजा-अर्चा दिवाबत्ती व देखभालीकरिता तत्कालीन राजे-महाराजे यांनी गट नं. २७३/१अ, २७३/१ब या मिळकती बाळकृष्ण गोपाळ भट-जोशी यांच्याकडे सोपविल्या होत्या. धर्मादाय आयुक्तांकडे या जमिनींची नोंद आहे.तथापि, वहिवाटदार गजानन बाळकृष्ण जोशी यांचे बंधू मनोहर यांनी सदर मिळकतीबाबत मिळालेल्या वटमुखत्यारपत्राच्या आधारे धर्मादाय आयुक्तांची पूर्वपरवानगी न घेता आनंदा धोंडिबा पोवार यांना खरेदी देण्याचा बेकायदेशीर करार लिहून दिला आहे. या व्यवहाराची माहिती समजताच ग्रामस्थांनी दिवाणी न्यायालयात दाद मागितली. त्यावेळी पोवार यांनी जोशी यांच्या वारसांशी संगनमत करून आणि दिवाणी न्यायालयाची दिशाभूल करून हुकूमनामा मिळविला. त्याआधारे पीकपाहणी सदरी नाव लावण्यासाठी तहसीलदारांकडे अर्ज केला. त्यावरून ग्रामस्थांनी प्रांताधिकाऱ्यांकडे तक्रार केली. वहिवाटदार मयत गजानन जोशी यांच्या वारसांनीही या जमिनीवरील वारसा हक्क स्वखुशीने सोडत असल्याचे पत्र दिले आहे. तक्रारीच्या सुनावणीअंती प्रांताधिकाऱ्यांनी देवस्थान इनाम खालसा करण्याची बेकायदेशीर फेरफार रद्द करण्याबरोबरच पीकपाहणी सदरी असलेली नावे कमी करण्याचा आदेश दिला आहे. त्याची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.निवेदनावर, ‘स्वाभिमानी’चे राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर, धनाजी पाटील, प्रकाश मोदर, शिवाजी राणे, राजेंद्र देसाई, श्रीकांत भोसले यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (प्रतिनिधी)मागणी काय... आंदोलन का?देवस्थानची देखभाल व त्या जमिनीसाठी वहिवाटदार नेमण्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही होण्यासंदर्भात जिल्हाधिकारी व देवस्थान समितीकडे वेळोवेळी निवेदने, अर्ज-विनंत्या करण्यात आल्या आहेत. मात्र, त्याबाबत कार्यवाही झालेली नाही. त्यामुळेच देवस्थान जमिनीसाठी वहिवाटदार नेमण्याची कार्यवाही १४ डिसेंबर २०१५ पर्यंत करावी, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने, उपोषण करावे लागेल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.