शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

मंदिराला हात लावाल तर जनक्षोभ

By admin | Updated: November 25, 2015 00:45 IST

हिंदुत्ववादी संघटनांचा इशारा : घाईगडबडीत कारवाई नको

कोल्हापूर : महापालिकेने तयार केलेली अनधिकृत मंदिरांची यादी चुकीची आहे. त्यामुळे एकाही मंदिराला प्रशासनाने हात लावला तर जनक्षोभ उसळेल, असा इशारा हिंदुत्ववादी संघटनांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन दिला. भाजप महानगर जिल्हाध्यक्ष महेश जाधव म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात कुठेही अनधिकृत मंदिरे पाडा, असे म्हटलेले नाही. शहरातील अनेक अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष करून केवळ मंदिरांना अनधिकृत ठरविणे चुकीचे आहे. सर्वच मंदिरे नियमित करावीत, ही मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे. त्यामुळे प्रशासनाने घाईगडबडीत मंदिर पाडण्याची कारवाई करू नये. अन्य धर्मीयांची बेकायदेशीर धार्मिकस्थळे हटवावी म्हणून यापूर्वी आम्ही आंदोलने केली. त्याची दखल प्रशासनाने घेतली नाही. दीपक मगदूम म्हणाले, एका रात्रीत मंदिरे अनधिकृत ठरवणे पूर्णत: चुकीचे आहे. अधिकाऱ्यांनी सर्व्हे चुकीचा केला आहे. नोटिसा दिलेली अनेक मंदिरे दहा वर्षांहून अधिक काळ जुनी आहेत. त्यामुळे घाईगडबडीत मंदिरांसंबंधी निर्णय घेऊ नये. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, मंदिराचा प्रश्न कायदा आणि व्यवहार यांची सांगड घालून हाताळावेत. शहरात अनेक ठिकाणी बेकायदेशीर बांधकामे आहेत. पार्किंगसाठीच्या जागा बळकावल्या आहेत. त्याकडे आधी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. भाजपचे जिल्हा चिटणीस अशोक देसाई , विश्व हिंदू परिषदेचे ज्ञानदेव पुंगावकर, हिंदू एकताचे महेश इंगवले, हिंदू युवा प्रतिष्ठानचे महादेव कुकडे, आदी उपस्थित होते. ( प्रतिनिधी )हिंदुत्वादीकार्यकर्ता म्हणून...मंदिरासंबंधी आपण मांडलेली भूमिका शासन म्हणून मांडली आहे का, अशी विचारणा जाधव यांच्याकडे केली. त्यावेळी त्यांनी ठाम नकार दिला. हिंदुत्ववादी कार्यकर्ता म्हणून माझे हे मत मांडल्याचेही त्यांनी सांगितले.