शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिकांना हवा असेल तर नाणार प्रकल्प हाेईल : राजन साळवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:22 IST

राजापूर : कोकणात रोजगार नाही... नोकऱ्या नाहीत त्यामुळे प्रकल्प व्हावा, अशी मागणी स्थानिकांकडून पुढे येत आहे. स्थानिकांनी मागणी केली ...

राजापूर : कोकणात रोजगार नाही... नोकऱ्या नाहीत त्यामुळे प्रकल्प व्हावा, अशी मागणी स्थानिकांकडून पुढे येत आहे. स्थानिकांनी मागणी केली तर भविष्यात नाणार प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री सकारात्मक निर्णय घेतील, असा आशावाद वाटतो, असे सूचक विधान आमदार राजन साळवी यांनी मुंबईत एका वृत्त वाहिनीशी बोलताना केले. त्यामुळे नाणार प्रकल्पाचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.

राजापूर तालुक्यात आलेल्या जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पासह नाणार रिफायनरी प्रकल्पाविरुध्द शिवसेनेने सुरुवातीपासूनच प्रखर विरोधाची भूमिका घेतली होती. तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारविरोधात आंदोलने झाली. एका तरूणाचा त्यात मृत्यूही झाला. तरीही काँग्रेस आघाडी सरकारने आपले प्रयत्न सुरू ठेवले. अखेर हेक्टरी साडेबावीस लाख रुपये सानुग्रह देण्याची घोषणा सरकारने केल्यानंतर लोकांनी मोबदला स्वीकारण्यास सुरूवात केली. आतापर्यंत जैतापूर परिसरातील सुमारे ९५ टक्के प्रकल्पग्रस्त जनतेने शासनाकडून मिळणारा मोबदला स्वीकारला आहे.

या पार्श्वभूमीवर आमदार राजन साळवी यांनी एका वाहिनीला मुलाखत देताना आपली भूमिका मांडली. जैतापूरप्रमाणेच शासनाने नाणार प्रकल्पग्रस्तांना मोबदला दिला तर शिवसेनेचा विरोध मावळेल का? असा प्रश्न आमदार साळवी यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, नाणार प्रकल्पासंदर्भात शिवसेना स्थानिक जनतेच्या पाठीशी आहे. स्थानिक जनतेने विरोध केल्यामुळेच शिवसेना पक्षप्रमुखांनी हा प्रकल्प रद्द करुन घेतला होता. मात्र, कोकणात रोजगार नाही, नोकऱ्या नाहीत, त्यामुळे नाणार प्रकल्प व्हावा, अशी मागणी स्थानिक जनतेतून पुढे येत आहे. भविष्यात हा प्रकल्प व्हावा, अशी मागणी स्थानिकांनी केली तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्याबद्दल योग्य निर्णय घेतील, असे साळवी यांनी सांगितले.