शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:च्या क्षमता ओळखा, अपयशाने खचू नका

By admin | Updated: December 19, 2014 23:36 IST

गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलीस अधीक्षक दीपाली काळे : राजर्षी शाहू व्याख्यानमाला

कोल्हापूर : स्पर्धा परीक्षांकडे ‘लाच न देता मिळणारी नोकरी’ या उद्देशाने पाहिले जाते. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी प्रथम आपले ध्येय ठरवून स्वत:च्या क्षमता ओळखणे गरजेचे आहे. काहीवेळा अपयशही पदरी पडेल; पण त्यामुळे खचून न जाता प्रयत्नांत सातत्य ठेवावे, असे मार्गदर्शन गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलीस अधीक्षक दीपाली काळे यांनी केले. महापालिकेच्या भास्करराव जाधव वाचनालयाच्यावतीने आयोजित राजर्षी शाहू व्याख्यानमालेत त्यांनी ‘स्पर्धा परीक्षा आणि व्यक्तिमत्त्व विकास’ या विषयावर व्याख्यान दिले. यावेळी महापालिकेचे मुख्य लेखापाल संजय सरनाईक, अतिरिक्त परिवहन निरीक्षक संजय भोसले उपस्थित होते. काळे म्हणाल्या, काहीवेळा आपण आई-वडील, मित्र किंवा कुणीतरी सांगितल्यामुळे स्पर्धा परीक्षा देतो, कित्येक जणांकडून पदवी घेतल्यानंतर नोकरी लागेपर्यंतचा वेळ म्हणून अभ्यास केला जातो. मात्र, स्पर्धा परीक्षांमध्ये पाऊल ठेवताना काय करायचे आहे हे ठरविले पाहिजे. सुप्तावस्थेत असलेल्या स्वत:च्या क्षमता ओळखून त्यांचा वापर करता आला पाहिजे. यशाला शॉर्टकट कधीच नसतो. तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यानंतरही काहीवेळा अपयश येऊ शकते; पण त्या अपयशाने खचून न जाता प्रयत्नांत सातत्य ठेवणे गरजेचे आहे. स्वत:वर विश्वास ठेवून वेळेचे योग्य नियोजन करा. छोट्या-छोट्या चुकांकडे लक्ष द्या. पहिली संधी कधीच सोडू नका. अनेकदा ही पहिली संधीच आपल्याला यश देऊन जाते; त्यामुळे उद्या अभ्यास करूया, पुढच्या वेळी परीक्षा देऊया, असा आळस करू नका, असा सल्लाही त्यांनी दिला. शीला पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)