शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीत संघर्षाची चिन्हे

By admin | Updated: May 28, 2015 00:58 IST

स्वच्छतेचा प्रश्न : कामगार संघटनांचा ‘खो’; बचतीचे धोरण बारगळण्याची शक्यता

 इचलकरंजी : बचतीच्या धोरणाचा स्वीकार करून येत्या १ जूनपासून शहरातील दहा वॉर्डात साफसफाई व कचरा उठावाचे काम नगरपालिका कर्मचाऱ्यांमार्फतच करण्याचा निर्णय नुकताच घेतला. त्याला कामगार संघटनांनीसुद्धा संमती दर्शविली, पण आता जादा कामाचे कारण सांगत काही कामगार संघटना या उपक्रमाला ‘खो’ घालण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे स्वच्छता प्रश्नावरून पदाधिकारी व कामगार संघटनांमध्ये संघर्ष निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.दरम्यान, शनिवारी ३० मे रोजी होणाऱ्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेसमोर हा विषय ठेवला असून, या विषयावर सभेमध्ये जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे. शहरातील एकूण २५ प्रशासकीय वॉर्डांपैकी सध्या १४ वॉर्डांमध्ये खासगी मक्तेदारामार्फत साफसफाई व कचरा उठावाचे काम केले जाते. यासाठी वर्षाला सुमारे ७ कोटी रुपयांचा बोजा पालिकेवर पडत आहे. यातून बचतीचा मार्ग काढण्याच्या उद्देशाने नगरसेवक विठ्ठल चोपडे यांनी पालिकेचे पाच कोटी रुपये कसे वाचतील, या संदर्भात विस्तृत आराखडा तयार केला होता. त्यावर चर्चा होऊन संमतीही मिळाली.पालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता चार दिवसांपूर्वी नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांनी प्रमुख मंडळी व नगरसेवकांची बैठक घेऊन साफसफाई व कचरा उठावाचे काम पालिका कर्मचाऱ्यांमार्फतच करण्याचा निर्णय घेतला. विविध कामगार संघटनांच्या पदाधिकारी, कर्मचाऱ्यांनी संमती दर्शविली. त्यानुसार १ जूनपासून हा उपक्रम हाती घेण्यात येणार होता. संमतीनंतरही काही संघटनांचा विरोधकाही संघटनांनी या उपक्रमाला विरोध दर्शविण्यास सुरुवात केली असून, त्यासाठी जादा कामाचे कारण पुढे केले जात आहे. मुळातच शासकीय नियमानुसार कामापेक्षाही कमी प्रमाणात काम स्वच्छता कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. या उपक्रमातून पालिकेची पाच कोटी रुपयांची बचत होणार आहे, पण संमतीनंतर आता काही संघटना त्याला विरोध करू लागल्याने या मागचे नेमके कारण काय, असा सवाल केला जात आहे.