शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीला दोन दिवसांतून एकदा पाणी

By admin | Updated: March 12, 2015 00:09 IST

उन्हाळ्याबरोबर टंचाईचे चटके : नागरिक, महिला वर्गातून संताप, ‘नदी उशाला आणि कोरड घशाला’ या म्हणीप्रमाणे अवस्था

अतुल आंबी - इचलकरंजी -उन्हाळ्याची सुरुवात झाली आणि नागरिकांना पाणीटंचाईची झळ बसू लागली. ‘नदी उशाला आणि कोरड घशाला’ या म्हणीप्रमाणे इचलकरंजीवासीयांची अवस्था झाली आहे. वर्षभर एक दिवसआड येणारे पाणी आता दोन ते तीन दिवसआड मिळत आहे.विविध राजकीय पक्षांनी निवडणुकीपूर्वी २४ बाय ७ ची घोषणा केली असली तरी दिवसातून एकवेळ पाणी देणेसुद्धा नगरपालिकेला आजतागायत जमले नाही. त्यामुळे नेमके पाणी मुरते कुठे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.शहरात ५४ एमएलडी (दशलक्ष लिटर) पाणी शुद्धिकरण प्रकल्प सध्या कार्यान्वित असून, आणखीन एक ५४ एमएलडीचा शुद्धिकरण प्रकल्प उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. शहराला पंचगंगा व कृष्णा या दोन नद्यांतून पाणीपुरवठा करणाऱ्या योजना आहेत. या योजनांमधून प्रकल्पाला ४० एमएलडी पाणीपुरवठा होतो. मात्र, नगरपालिकेचे योग्य नियोजन नसल्याने पाणीपुरवठा सुरळीत होऊ शकत नाही. ४० एमएलडी पाण्यामधील शुद्ध केलेले ३० टक्के पाणी नळांना तोट्या नसल्याने वाया जाते. दहा टक्के कारखान्यांना वापर केला जातो. कारखान्यांमध्ये शुद्ध पाण्याची आवश्यकता नसताना हे पाणी वाया जाते.त्याचबरोबर शहरात नवी-जुनी अशी एकूण सुमारे एक हजार किलोमीटर पाईपलाईन करण्यात आली आहे. यामध्ये जुनी नलिका न काढता नवीन बसविल्याने दोन्ही नळ्यांमध्ये पाणी खेळल्याने नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. काही भागात ‘वशिला’ असलेल्या नागरिकांनी बेकायदेशीररित्या अर्धा-पाऊण इंची जोडणी घेतली आहे. याचाही पाणीपुरवठ्यावर विपरित परिणाम होतो. नळांना मीटर बसविणे. त्याचबरोबर बेकायदेशीर जोडण्या बंद करणे, यासह जुन्या पाईपलाईन थांबवून एकमार्गी नवीन पाईपलाईनमधून पाणी देणे यासारख्या उपाययोजना करून नगरपालिकेने योग्य पद्धतीने नियोजन केल्यास सध्या प्रकल्पात येणारे ४० एमएलडी पाणीसुद्धा दररोज नागरिकांना पुरवठा करता येणे शक्य आहे. हे नियोजन नसल्याने एक दिवसआड मिळणारे पाणी आता गेल्या वीस दिवसांपासून दोन-तीन दिवसांआड मिळत आहे. त्यामुळे नागरिक व महिला वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे.