पत्नीच्या निधनाचा धक्का सहन झाल्याने पतीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:24 IST2021-05-11T04:24:14+5:302021-05-11T04:24:14+5:30

मिठारी परिवारासह संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. प्राथमिक शिक्षक असलेल्या कृष्णात मिठारी (गुरुजी) यांनी जिल्हा परिषद शाळेत आपली पस्तीस ...

Husband dies after suffering shock of wife's death | पत्नीच्या निधनाचा धक्का सहन झाल्याने पतीचा मृत्यू

पत्नीच्या निधनाचा धक्का सहन झाल्याने पतीचा मृत्यू

मिठारी परिवारासह संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

प्राथमिक शिक्षक असलेल्या कृष्णात मिठारी (गुरुजी) यांनी जिल्हा परिषद शाळेत आपली पस्तीस वर्षे सेवा केली. सेवा करत असताना गोरगरीब समाजातील अनेक विद्यार्थ्यांसह आपल्या मुलांनाही स्वावलंबी शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे धडे दिले. आज त्यांची तीन ही मुले उच्चपदावर काम करत आहेत. पंधरा दिवसांपूर्वी त्याच्या पत्नी इंदुबाई मिठारी यांचा आकस्मित निधन झाले होते. त्यांच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने ते अस्वस्थ होते. पत्नीचे उतरकार्य झाल्यापासून त्यांनी जेवण न घेतल्याने त्यांची तब्येत खालावली आणि आज पत्नीच्या पाठोपाठ पंधराव्या दिवशी त्यांचेदेखील निधन झाले. आई-वडिलांचे पंधरा दिवसाच्या अंतराने निधन झाल्यामुळे मिठारी कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. या घटनेने निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Husband dies after suffering shock of wife's death