पत्नीचा खून करून पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:45 IST2021-02-21T04:45:12+5:302021-02-21T04:45:12+5:30

शिरोळ : पती- पत्नीच्या भांडणातून पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूरजवळील धरणगुत्ती येथे घडली. अर्चना ...

Husband attempts suicide by killing wife | पत्नीचा खून करून पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

पत्नीचा खून करून पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

शिरोळ : पती- पत्नीच्या भांडणातून पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूरजवळील धरणगुत्ती येथे घडली. अर्चना चेतन घोरपडे (वय २५, रा. जयप्रकाश हाऊसिंग सोसायटी), असे मृत महिलेचे नाव आहे. खुनानंतर पती चेतन मनोहर घोरपडे (वय ३०) याने फिनेल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावर सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली.

पोलिसांनी सांगितले की, मूळची शिरोळ येथील असलेली अर्चना हिचा जयसिंगपूर येथील चेतन घोरपडे याच्याशी आठ वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता. गेल्या दोन महिन्यांपासून पती-पत्नीमध्ये वाद सुरू होता. या वादातूनच अर्चना दहा दिवसांपूर्वी शिरोळला माहेरी गेली होती. शनिवारी सकाळी औद्योगिक वसाहतीत ती कामावर गेली होती. तिला चेतन आपल्या घरी घेऊन गेला होता. मोबाइल चार्जरच्या वायरने त्याने तिचा गळा आवळला. त्यानंतर ब्लेडने हाताची नस कापून गळ्यावरदेखील वार केल्यामुळे अर्चना जागीच ठार झाली. संशयित चेतन हा काकासाेबत जयसिंगपूर पोलिसांत आल्यानंतर खुनाची घटना उघडकीस आली.

फोटो - २००२२०२१-जेएवाय-०२-संशयित

चेतन घोरपडे, मृत अर्चना घोरपडे

Web Title: Husband attempts suicide by killing wife