शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

गणित नसेल तर अभियांत्रिकीचे शिक्षण कसे घ्यायचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेताना भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित हे विषय आवश्यक आहेत. मात्र, ऑल ...

लोकमत न्यूज नेटवर्क,

कोल्हापूर : अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेताना भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित हे विषय आवश्यक आहेत. मात्र, ऑल इंडिया कौन्सिल फाॅर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई) ने या तिन्ही विषयांत उर्तीण होण्याची अट रद्द केली आहे. मात्र, या बदलामुळे अभियांत्रिकीचा पायाच असणारे विषय जर वगळले तर अभियांत्रिकी(इंजिनिअरिंग) चे शिक्षण कसे घ्यायचे, असा सवाल तज्ज्ञांनी केला आहे, तर विद्यार्थ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

अभियांत्रिकीमध्ये भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र (पीसीएम) हे विषय घेऊन बारावी उत्तीर्ण झालेला विद्यार्थी अभियांत्रिकीसाठी प्रवेश घेऊ शकत होता. ज्यांना हे तिन्ही विषय अवघड जात होते. त्यांनाही आता अभियांत्रिकीला प्रवेश मिळू शकतो. मात्र, गणित हा विषय या शाखेचा आत्मा आहे. हाच जर वगळला तर अभियांत्रिकीचे शिक्षण कसे घ्यायचे, असा सवाल अभियांत्रिकीमधील तज्ज्ञ अभ्यासकांना पडत आहे. हा निर्णय कलात्मक दृष्टी असलेल्या विद्यार्थ्यांकरिता घेतला आहे का, असा सवालही तज्ज्ञ करीत आहेत. विशेष म्हणजे या बदललेल्या निर्णयानुसार अभ्यासक्रमाच्या एक-दोन बॅचेस झाल्यानंतरच त्याचा परिणाम जाणवणार आहे. अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमात भौतिकशास्त्र व गणित हा विषय महत्त्वाचा आहे. अभियांत्रिकीला पहिल्या वर्षी एम-१, एम-२, एम-३ हे गणिताचे व भौतिकशास्त्र हे विषय सक्तीचे आहेत. अकरावी, बारावीला हे विषय नसतील तर अभियांत्रिकीच्या पहिल्या व दुसऱ्या वर्षी उत्तीर्णच होऊ शकणार नाहीत.

भौतिकशास्त्र म्हणजे अभियांत्रिकी आहे. यातील प्रश्न सोडविण्यासाठी गणिताची गरज लागते. प्रायोगिक तत्त्वावर अशा पद्धतीने कुठे हा अभ्यासक्रम सुरू आहे. त्याची उदाहरणेही द्यावीत. ही अट रद्द करून केवळ ज्यांना हे विषय अवघड जात असतील त्यांनाही अभियांत्रिकीचे शिक्षण घेता येईल. जागा भरावयाची म्हणून हा निर्णय धोकादायक आहे. याबाबत एक-दोन बॅचेस पूर्ण झाल्यानंतर हा बदललेला अभ्यासक्रम उपयुक्त आहे की नाही हेही समजेल. या अभ्यासक्रमात दर्जाही महत्त्वाचा आहे, तर विद्यार्थ्यांमधून या निर्णयाचे स्वागत होत आहे. दहावीपर्यंत हे तिन्ही विषय होते. तेच पुढे अभ्यासक्रमात आहेत, असे म्हणणे आहे. त्यामुळे एकूणच या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

-------------------------------

कोट

अभियांत्रिकीला पीसीएम ग्रुप महत्त्वाचा आहे. मात्र, एआयसीटीईने कोणता उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला आहे, हे माहीत नाही. या अभ्यासक्रमाच्या एक-दोन बॅचेस बाहेर पडणे आवश्यक आहे. दर्जाही महत्त्वाचा आहे.

- जयदीप बागी, संचालक, शिवाजी विद्यापीठ, तंत्रज्ञान विभाग

------------------------

कोट

गणित हा अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचा पाया आहे. पहिल्या वर्षाला एम-१, एम-२, एम-३, फोर असे विषय आहेत. पायाच कच्चा असेल तर विद्यार्थी अनुत्तीर्णच होतील. एअरफोर्स टेक्निकलला प्रवेश मिळू शकणार नाही.

- प्रा. अभिजित पाटील, खासगी क्लासेस

--------------------------

कोट....

गणिताऐवजी जीवशास्त्र घेतलेल्या विद्यार्थ्यांनाही आता अभियांत्रिकीला प्रवेश घेता येईल. अनेक विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल.

सिद्धार्थ पाटील, अभियांत्रिकी विद्यार्थी,

-------------------------

कोट....

दहावीपर्यंतच्या अभ्यासक्रमात तिन्ही विषयांचा अभ्यास झालेला आहे. त्यामुळे अभियांत्रिकीला प्रवेश घेतल्यानंतर त्याचा काहीच परिणाम होणार नाही. त्यामुळे एआयसीटीईने घेतलेला निर्णय निश्चितच चांगला आहे.

- राज पाटील, स्थापत्य अभियंता