शिक्षक बँकेत कर्ज नसताना थकबाकी कशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:24 IST2021-09-11T04:24:38+5:302021-09-11T04:24:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : प्राथमिक शिक्षक बँकेचे सभासदत्वच मी रद्द केले आहे. तिथे माझे कोणत्याहीप्रकारचे कर्ज नसताना थकबाकी ...

How to pay arrears when there is no loan in the teacher bank | शिक्षक बँकेत कर्ज नसताना थकबाकी कशी

शिक्षक बँकेत कर्ज नसताना थकबाकी कशी

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : प्राथमिक शिक्षक बँकेचे सभासदत्वच मी रद्द केले आहे. तिथे माझे कोणत्याहीप्रकारचे कर्ज नसताना थकबाकी कशी? अशी विचारणा करत बँकेचे माजी संचालक रविकुमार पाटील यांनी केलेल्या आरोपाबाबत त्यांच्यावर फौजदारी दाखल करणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष व शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष राजाराम वरुटे यांनी पत्रकातून दिली.

सेवानिवृत्त झाल्यानंतर बँकेचे सभासदत्व रद्द करून घेतले, त्यामुळे तिथे कर्ज थकित ठेवण्याचा विषयच येत नाही. गेल्या दहा वर्षांत बँकेने केलेल्या नेत्रदीपक प्रगतीमुळे विरोधकांच्या हातात टीकेसाठी मुद्दाच नसल्याने व्यक्तीगत व चुकीचे आरोप करत आहेत. सभासदांनी प्रत्येकाचे रंग ओळखल्याचे राजाराम वरुटे यांनी पत्रकात म्हटले आहे.

रविकुमार यांना बोलण्याचा नैतिक अधिकार काय

रविकुमार पाटील २००८-०९ मध्ये बँकेचे अध्यक्ष असताना, १ कोटी ६९ लाखांचा तोटा होता. अशा मंडळींनी शिक्षक बँकेच्या कारभारावर बोलण्याचा नैतिक अधिकार नसल्याचा पलटवार वरुटे यांनी केला.

Web Title: How to pay arrears when there is no loan in the teacher bank