शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेल सुखसागरची तोडफोड, मालकास मारहाण

By admin | Updated: June 15, 2014 01:54 IST

मंदिर परिसरातील झाडे तोडल्याच्या रागातून कृत्य

कोल्हापूर : महादेवाच्या मंदिरासमोरील झाडे तोडल्याच्या रागातून २० ते २५ जणांच्या जमावाने आज, शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास शाहूपुरी-लक्ष्मीपुरी परिसरातील हॉटेल सुखसागरवर हल्ला चढवीत साहित्याची तोडफोड केली. यावेळी हॉटेलमालक बालकृष्ण शेट्टी (रा. ई वॉर्ड, शाहूपुरी) यांनाही मारहाण करण्यात आली. अचानक झालेल्या या घटनेमुळे गोंधळ उडाला. याबाबत पोलिसांनी सांगितले, हॉटेल सुखसागरच्या पश्चिमेला ओढावरचा नवा पूल आहे. या दोन्हींच्या मध्ये महापालिकेच्या मालकीची रिकामी जागा आहे. याठिकाणी महादेवाचे मंदिर असून त्याशेजारी उंबराचे व सुकलेले अशी दोन झाडे आहेत. त्यांना लागूनच विद्युत खांब आहे. या खांबावरून सुमारे ३३ हजार मेगावॅटची विद्युतवाहिनी गेली आहे. तिला दोन्ही झाडांच्या फांद्यांचा स्पर्श होत होता. पुढील धोका ओळखून हॉटेलमालक शेट्टी यांनी आज दुपारी ही दोन्ही झाडे कापून टाकली. हा प्रकार परिसरातील स्थानिक नागरिकांना समजला. धार्मिक भावना दुखावल्याबद्दल परिसरातील संतप्त महिला व तरुणांचा जमाव घटनास्थळी आला. मंदिरासमोरील झाडे तोडल्याचे पाहताच संतप्त जमावाने हॉटेलवर तुफान दगडफेक केली. हॉटेलबाहेरील कुंड्या व आतील साहित्याची तोडफोड केली. जमावाने हॉटेलमालक शेट्टी यांनाही बेदम मारहाण केली. हा प्रकार हाकेच्या अंतरावर असलेल्या लक्ष्मीपुरी पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जमावाला पांगिवले. ही घटना शाहूपुरी पोलिसांच्या हद्दीत असल्याने परिसरातील महिला व तरुणांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. यावेळी त्यांनी पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव यांच्याकडे हॉटेलमालक शेट्टी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. शेट्टी यांच्याकडूनही पोलिसांनी लेखी लिहून घेतले. दरम्यान, महापालिका हद्दीतील झाडे शेट्टी यांनी कोणतीही परवानगी न घेता परस्पर तोडल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेनंतर हॉटेल बंद ठेवण्यात आले होते; तर पोलिसांच्या गस्तीची व्हॅन हॉटेलसमोर तळ ठोकून होती. (प्रतिनिधी)