शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

सर्वांसाठी घरे; महिन्याभरात आराखडा

By admin | Updated: September 9, 2016 01:12 IST

प्रधानमंत्री आवास योजना : महापालिका प्रशासनाकडून छाननीचे काम गतीने; केंद्राच्या मंजुरीनंतर अंमलबजावणी

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सर्वांसाठी घरे आणि शहरातील झोपडपट्टींच्या पुनर्विकास करण्याचा संपूर्ण आराखडा येत्या १५ आॅक्टोबरपर्यंत पूर्ण करून तो राज्य सरकारच्या मान्यतेने केंद्र सरकारकडे मंजुरीकरीता पाठविण्याचे लक्ष्य महानगरपालिका प्रशासनाने ठेवले आहे. सध्या कर्ज, अनुदान व परवडणारी घरे मागणीसाठी आलेल्या अर्जांची छाननी युद्धपातळीवर सुरू असून तीन झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षणही पूर्ण केले जात आहे. २०२० पर्यंत सर्वांसाठी घरे देण्याची योजना केंद्र सरकारने ‘प्रधानमंत्री आवास योजना’ या नावाने सुरू केली आहे. पूर्वीच्या काँग्रेस आघाडी सरकारने ही योजना ‘इंदिरा आवास योजना’ या नावाने राबविण्याचा प्रयत्न केला होता. भाजपप्रणित केंद्र सरकारने आता हीच योजना नव्याने आणली आहे. त्यानुसार कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने शहरातील नागरिकांनी या योजनेअंतर्गत अर्ज मागविले होते. जी कुटुंबे भाड्याच्या घरात राहतात त्यांना परवडणारी घरे द्यायची, ज्यांच्याकडे स्वत:ची जागा आहे त्यांना कमी व्याजदराने कर्ज द्यायचे आणि दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना अनुदान द्यायचे, अशा तीन प्रकारांत ही योजना राबविली जाणार आहे. याशिवाय शहरातील झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करण्याचेही केंद्र सरकारचे धोरण असून त्याचाही सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचना महापालिकेस प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार शहरातील ५३ झोपडपट्ट्यांचे सर्व्हेक्षण केले जात आहे. हे काम जवळजवळ पूर्ण होत आले आहे. केवळ लक्षतीर्थ, तोफेचा माळ आणि वारे वसाहत येथील झोपड्यांचे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात आले आहे. झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास आहे त्याच जागांवर करण्याचा सरकारचा निर्णय झाला आहे. त्यामुळे झोपडपट्टीत ज्यांची पक्की घरे आहेत त्यांना वगळून हा प्रकल्प अहवाल तयार केला जाईल. ज्यांची अद्यापही कच्ची घरे आहेत त्यांना ती पक्की बांधून दिली जातील. या योजनेत कोणावर सक्ती करण्यात येणार नाही; परंतु जे येतील त्यांना सर्वप्रकारचे सहकार्य केले जाणार आहे.सर्वांसाठी घरे आणि झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास यांचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. साधारणपणे १५ आॅक्टोबरपर्यंत हा अहवाल तयार करून तो राज्य सरकारच्या मान्यतेने केंद्र सरकारकडे पाठविला जाईल, असे मनपा झोपडपट्टी विभागाकडील प्रकल्प अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी सांगितले. (प्रतिनिधी)तिन्ही प्रकारात : ४७३६ अर्ज प्राप्ततीन प्रकारांत मिळून महापालिकेस ४७३६ अर्ज प्राप्त झाले आहेत. केंद्र व राज्य सरकारने घालून दिलेल्या निकषांप्रमाणे अर्ज केलेली कुटुंबे योजनेत समाविष्ट होतात का याची छाननी सध्या सुरू आहे. त्यानंतर त्यांची अंतिम यादी तयार केली जाणार आहे. त्यानंतर त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला जाणार आहे. राज्य सरकारच्या मान्यतेने तो केंद्र सरकारच्या अंतिम मान्यतेकरीता पाठविला जाईल.