शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲपलचा विरोध, विरोधकांचाही विरोध! केंद्राचा  'संचार साथी' ॲपवर यू-टर्न, प्री-इंस्टॉल करण्याची अनिवार्यता मागे घेतली...
2
Ruturaj Gaikwad Maiden Century : पुणेकरानं संधीचं सोनं करुन दाखवलं! या कारणामुळं ऋतुराजची पहिली सेंच्युरी ठरते खास
3
सांगलीतील आष्ट्यातील स्ट्राँगरुमबाहेर महाविकास आघाडीचा गदारोळ; मतांच्या आकडेवारीत तफावत, सुरक्षा नसल्याचाही दावा
4
अल-फलाहचा बनावट कारभार! रोज तयार व्हायची १००-१५० बोगस रुग्णांची यादी; विरोध केल्यास हिंदू कर्मचाऱ्यांचा पगार कापायचे
5
पुतीन भारतात येण्यापूर्वी रशियाकडून मोठी भेट...! रशियन लष्करी तळ वापरता येणार, त्यांच्या संसदेची मंजुरी...
6
दिल्ली कार स्फोटातील मुख्य आरोपी जसीरच्या कोठडीत वाढ! NIA आणखी चौकशी करणार; नेमके आरोप काय? 
7
Gold Silver Price Today: चांदी ऑल टाईम 'हाय'वर; सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदी करणार असाल तर खिसा करावा लागेल रिकामा
8
'मुंबई इंडियन्स'ने संघात घेताच कर्णधार शार्दुल ठाकूरचा धमाका; ७ चेंडूत घेतले ४ बळी
9
राज्यातील मतमोजणी पुढे ढकलणारी याचिका कोणी केली होती? वर्ध्यात सगळा घोळ झाला, या पक्षाच्या उमेदवाराने....
10
फार्मा क्षेत्रातील दुसरी सर्वात वेगवान वाढणारी कंपनी IPO आणतेय; एका लॉटसाठी किती पैसे लागणार?
11
सावधान! आईस्क्रीम, च्युइंगम, शुगर फ्री प्रोडक्टमुळे लिव्हर खराब; खाण्याआधी एकदा 'हे' वाचाच
12
'जनता माफ करणार नाही', पंतप्रधान मोदींचा चहा विकतानाच्या एआय व्हिडिओवरुन भाजपची जोरदार टीका
13
iPhone Air च्या किंमतीत मोठी घसरण, आजवरचा सर्वात स्लीम iPhone सर्वात स्वस्त! जाणून घ्या सविस्तर
14
IND vs SA : हिटमॅन रोहितला अंपायरनं दिलं Not Out; पण क्विंटन डी कॉकच्या हुशारीनं निर्णय बदलला अन्....
15
लग्नाला जाण्याचा बहाणा करून 'तो' गुपचुप गर्लफ्रेंडला भेटायला गेला, मुलीच्या घरच्यांनी पाहिलं अन् पुढे जे झालं..
16
एकाच्या बदल्यात २४ फ्री शेअर्स देणार ही कंपनी; ५५९३% चा मल्टीबॅगर रिटर्न, शेअरधारकांना दुसऱ्यांदा मोठं गिफ्ट
17
Harshit Rana: भरमैदानात हर्षित राणाचा 'तो' इशारा; आयसीसीला खटकलं, ठोठावला 'इतका' दंड!
18
रुपया ऐतिहासिक नीचांकीवर; TCS झाली श्रीमंत! एकाच दिवसात २७,६४२ कोटींची कमाई; 'हे' आहे कारण?
19
'या' ७ देशात पाण्यासारखा वाहतो पैसा, पण पिण्याच्या पाण्यासाठी तरसतात लोक, कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: सोलरसाठी लोखंडी पाईप टेरेसवर चढवताना विजेचा धक्का, घरमालकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 12:41 IST

तरुण जखमी, शिवाजी पेठेतील दुर्घटना

कोल्हापूर : नवीन सोलर बसविण्यासाठी लोखंडी पाईप टेरेसवर चढवताना महावितरणच्या विद्युत तारेला स्पर्श होऊन विजेच्या धक्क्याने घरमालक रवींद्र रंगराव जाधव (वय ५२, रा. आयरेकर गल्ली, शिवाजी पेठ, कोल्हापूर) यांचा मृत्यू झाला. त्यांना मदत करण्यासाठी गेलेला सौरभ संजय साळुंखे (वय २४, सध्या रा. अंबाबाई यात्री निवास, ताराबाई रोड, कोल्हापूर, मूळ रा. तासगाव, जि. सांगली) हा जखमी झाला. ही घटना मंगळवारी (दि. २) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.सीपीआरच्या अपघात विभागातून मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्र जाधव यांच्या घराच्या टेरेसवर नवीन सोलर बसवायचा होता. त्यासाठी लोखंडी पाईप टेरेसवर चढवायच्या होत्या. मंगळवारी दुपारी त्यांनी ओळखीतील तरुण सौरभ साळुंखे याला पाईप वरती चढविण्यासाठी मदत करण्याची विनंती केली. दोरीने बांधलेल्या पाईप जाधव टेरेसवर ओढून घेत होते.काही पाईप चढवल्यानंतर एक पाईप हातात पकडताच ती तिरकी होऊन महावितरणच्या विद्युत तारेला चिकटली. विजेचा धक्का बसताच त्यांनी आरडाओरडा केला. हा प्रकार लक्षात येताच सौरभ त्यांच्या मदतीसाठी जिन्यातून टेरेसवर गेला. त्यावेळी तोही विजेच्या धक्क्याने जखमी झाला, तर जाधव हे रस्त्यावर पडले.गल्लीतील नागरिकांनी तातडीने दोघांना खासगी वाहनातून सीपीआरमध्ये दाखल केले. उपचारापूर्वीच जाधव यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. सौरभ याची प्रकृती स्थिर असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.कटुंबीयांना धक्कारवींद्र जाधव यांचा बाटलीबंद पेयजल विक्रीचा व्यवसाय होता. ते शिवाजी तालमीचे माजी अध्यक्ष होते. दुर्दैवी घटनेत त्यांचा मृत्यू झाल्याचे समजताच नातेवाईकांना धक्का बसला. त्यांनी सीपीआरच्या अपघात विभागाबाहेर हंबरडा फोडला. जाधव यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, भाऊ, आई असा परिवार आहे.सौरभचे नशीब बलवत्तरघरची परिस्थिती बेताची असल्याने तासगावचा सौरभ साळुंखे हा अंबाबाई यात्री निवासमध्ये राहून पार्टटाईम काम आणि स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतो. वाचनालयात एकत्र भेटत असल्याने सौरभ आणि रवींद्र जाधव यांची ओळख होती. याच ओळखीतून तो जाधव यांना मदत करण्यासाठी गेला होता. विजेचा धक्का लागल्याचे लक्षात येताच त्याने जाधव यांना वाचविण्यासाठी धाव घेतली. मात्र, त्यालाही जोरदार धक्का बसला. नशीब बलवत्तर म्हणून तो जाधव यांना चिकटला नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Electric Shock While Installing Solar Panel Kills Homeowner

Web Summary : A Kolhapur homeowner died from an electric shock while installing solar panels. He was moving iron pipes when one touched a power line. A helper was also injured. The deceased was a former president of Shivaji Talim.