शहरं
Join us  
Trending Stories
1
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
4
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
5
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
6
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
7
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
8
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
9
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
10
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
11
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
12
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
13
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
14
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
15
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
16
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
17
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
18
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
19
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
20
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown -गडहिंग्लज शहरात मस्जिदीत जमलेल्यांना केले होम क्वॉरंटाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 15:46 IST

गडहिंग्लज शहरातील मस्जिदीत आलेले लोक साफसफाईसाठी आल्याचे पोलिस चौकशीत निष्पन्न झाले. तरीदेखील त्यांची वैद्यकिय तपासणी करण्यात आली. त्यानंतर होम क्वॉरंटाईनमध्ये राहण्याच्या सूचना देवून सायंकाळी त्यांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे ते सामुदायिक नमाजसाठी जमल्याची अफवा निरर्थक ठरली. याप्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती.

ठळक मुद्देगडहिंग्लज शहरात मस्जिदीत जमलेल्यांना केले होम क्वॉरंटाईनगडहिंग्लज येथील प्रकार, नमाजसाठी जमल्याची अफवा निरर्थक

गडहिंग्लज : गडहिंग्लज शहरातील मस्जिदीत आलेले लोक साफसफाईसाठी आल्याचे पोलिस चौकशीत निष्पन्न झाले. तरीदेखील त्यांची वैद्यकिय तपासणी करण्यात आली. त्यानंतर होम क्वॉरंटाईनमध्ये राहण्याच्या सूचना देवून सायंकाळी त्यांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे ते सामुदायिक नमाजसाठी जमल्याची अफवा निरर्थक ठरली. याप्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती.दुपारी साडेबाराच्या सुमारास शहरातील मेन रोडवरील सुन्नी जुम्मा मस्जिदीत कांहीजण नमाज पठणासाठी जमल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांनी सहकाऱ्यांसह मस्जिदीकडे तात्काळ धाव घेतली.कोरोना संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर मस्जिदीचे प्रवेशद्वार बंद होते. पोलिसांनी आत जावून पाहिले असता त्याठिकाणी कोणीही नमाजपठण करताना आढळून आले नाही. मात्र, त्याठिकाणी आलेल्या सहाजणांना ताब्यात घेवून चौकशी केली असता त्यांनी मस्जिदीच्या साफसफाईसाठी आल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याची खातरजमा केली.दरम्यान, मस्जिदीत जमलेल्या त्या ६ जणांची उपजिल्हा रूग्णालयात वैद्यकिय तपासणी करून त्यांना दिवसभर येथील शासकीय वसतीगृहातील कोरोना विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले होते. त्यानंतर मस्जिदीच्या साफसफाईच्या कामासाठी संबंधितांना रितसर ओळखपत्रे घेण्याची आणि सर्वांना होम क्वॉरंटाईनमध्ये राहण्याची सूचना देवून त्यांना सायंकाळी घरी सोडण्यात आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर