शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

जागा हडपणाऱ्यांना ‘गोकुळ’वर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही

By admin | Updated: September 5, 2016 00:53 IST

महादेवराव महाडिक : सतेज पाटील यांच्यावर टीका

कोल्हापूर : महापालिकेच्या माध्यमातून शासकीय व गोरगरिबांच्या जागा हडप करणाऱ्यांना ‘गोकुळ’वर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांनी सभेला उपस्थित राहावेच, तेथील आदर्श कारभार पाहून तसा स्वत:च्या संस्थेत करावा, अशी टीका माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी केली. स्वार्थी प्रवृत्तीने आरोप करून संघ ताब्यात घेऊ पाहणाऱ्या उसन्यांचे स्वप्न पूर्ण होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. ‘गोकुळ’ची सर्वसाधारण सभा बुधवारी (दि. ७) होत आहे. सभेच्या पार्श्वभूमीवर विरोधी आमदार सतेज पाटील यांच्याकडून कारभारावर जोरदार टीका केली. विरोधी गटाला ‘जशास तसे’ उत्तर देण्याची तयारी सत्तारूढ गटाने केली असून या सगळ्या पार्श्वभूमीवर ‘गोकुळ’चे नेते महादेवराव महाडिक यांच्याशी संपर्क साधला असता, महाडिक यांनी पाटील यांचे नाव न घेता सडकून टीका केली. ‘गोकुळ’ देशात अव्वल स्थानावर आहे, स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर यांनी सरकार डेअरीचे सहकारात रूपांतर केले. अरुण नरके, रणजितसिंह पाटील, विश्वास पाटील, रवींद्र आपटे, अरुण डोंगळे, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संघाला यशोशिखरावर पोहोचविले. साडेसात लाख उत्पादक संघाशी संलग्न असून यातील दोन लाख भूमीहीन उत्पादक आहेत. आपण व पी. एन. पाटील संघाचे नेतृत्व करत आहे. पारदर्शक कारभारामुळे संघ नावारूपास आला आहे. काही मंडळींनी संघाच्या कारभारावर तक्रारी केल्या आहेत. आम्ही सरकारी यंत्रणेकडे त्याबाबत खुलासा केला आहे; पण हेच लोक महापालिकेत नेतृत्व करत आहेत. त्यांनी शासकीय व गोरगरिबांच्या जागा हडप करण्याचे काम केले असून अशा लोकांना संघावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. ज्यांनी कधी दूध संस्था काढली नाही, जे संघाचे उसने सभासद झाले आहेत, त्यांनी संघावर आरोप करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे असल्याचे महाडिक यांनी सांगितले. राज्यभर दुष्काळ असताना कोल्हापुरात केवळ दूध व्यवसायाने शेतकऱ्यांना आधार दिला. स्वार्थी प्रवृत्तीने कारभारावर आरोप करणाऱ्यांचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. आरोप करणाऱ्यांनी सभेला उपस्थित राहावेच, संघाचा कारभार पाहावा व तसा आपल्या संस्थेत करण्याचा प्रयत्न करावा, अशी टीकाही त्यांनी केली. ...अन्यथा शेतकरी संघ होईल! एकेकाळी संपूर्ण आशिया खंडात शेतकरी संघाचे नाव होते; पण त्या काळातील राजकारण्यांनी आरोप केले आणि मार्केटिंगवर परिणाम झाला. पुढे संघाचे काय झाले, हे जिल्ह्याला माहिती आहे. त्यामुळे ‘गोकुळ’वर आरोप करताना विचार करावा, अन्यथा शेतकरी संघ होईल, असेही महाडिक यांनी सांगितले. २५० सभासदांचा साखर कारखाना सहकारी कसा? आरोप करणाऱ्यांच्या संस्थांचे काम कसे चालले आहे, हे सांगण्याची गरज नाही आणि मी ते त्यावर बोलणारही नाही; पण केवळ २५० सभासद असणारा साखर कारखाना सहकारी कसा? असा सवालही त्यांनी केला.