शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

उच्चशिक्षित तरुणींचा वाढला कल!

By admin | Updated: March 9, 2015 23:45 IST

मोडणार पारंपरिक पायंडा : दुसऱ्या दिवशीही महिलांनी केली भरती प्रक्रियेची विचारपूस

सातारा : सामाजिक आरक्षणानुसार राज्य परिवहन महामंडळाने महिलांसाठी चालक भरतीत २,२५३ जागा राखीव ठेवल्या आहेत. मात्र, उमेदवार न मिळाल्याने दरवेळी निराशा येत होती. यासंदर्भात ‘लोकमत’ने स्त्रीशक्तीमध्ये जनजागृती केल्याने दोन दिवसांपासून महिलांनी फोन करून भरती प्रक्रियेची माहिती घेत होत्या. यामध्ये उच्चशिक्षित तरुणींची संख्या मोठी आहे.राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीतून वेळोवेळी चालक-वाहकांची भरती केली जाते. मात्र, आजवर भरती झालेल्या उच्चशिक्षित तरुणांची संख्या मोजकीच आहे. त्याला कारणीभूत सामाजिक परिस्थितीच होती. शिक्षणाकडे लक्ष नाही किंवा घरची जबाबदारी आल्याने तरुण मंडळी ओळखीकडेच वाहन चालवायला शिकत. त्याठिकाणीच नोकरी करून उदरनिर्वाह करत होते. चालक परवाना काढण्यासाठी आठवी पासची अट आहे. त्यामुळे केवळ एसटीत भरती व्हायचे म्हणून कित्येकजण मुक्त विद्यापीठातून दहावी उत्तीर्ण होत होते. त्यामुळे एसटीत भरती झाले तरी त्यांच्या मानसिकतेत फारसा बदल होत नव्हता.चालक-वाहक प्रवाशांशी हुज्जत घालतात, अरेरावीची भाषा वापरतात. त्यामुळे कार्पोरेट क्षेत्रात काम करत असलेले प्रोफाईल मंडळी एसटीपासून दुरावत होते. त्यामुळे महामंडळाने उच्चस्तरावरून ‘अभिवादन’ उपक्रम राबविला होता. मात्र, त्यालाही चालक-वाहकांमधून म्हणावा तेवढा प्रतिसाद मिळालेला नाही, अशी खंत एसटीचे अधिकारी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त करत आहेत.जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ‘लोकमत’ने महिलांसाठी एसटीचे क्षेत्र खुणावत असल्याची जाणीव करून दिली होती. विमान, रेल्वे चालविणारी रणरागिणी एसटीपासून दूर का? यासंदर्भात जनजागृती केल्यानंतर दोन दिवस जिल्ह्याच्या विविध भागांतून महिला फोन करून भरती प्रक्रियाची माहिती घेत होत्या. त्यासाठी आवश्यक पात्रता, प्रशिक्षण कोठे घेता येते, याची विचारणा करत होत्या. एसटीचे स्टिअरिंग हाती घेण्याचे स्वप्न पाहत असलेल्यांमध्ये उच्चशिक्षित तरुणींची संख्या मोठी आहे. सर्वसाधारणत: बारावीपासून ते पदवीचे शिक्षण घेतलेल्या महिला यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे अल्पशिक्षित चालक ही चाकोरी मोडीत काढली जाणार, हे निश्चित. अन् एसटी प्रशासनालाही हेच अपेक्षित असल्याचे यापूर्वी राबविलेल्या विविध उपक्रमांवरून स्पष्ट होत आहे. (प्रतिनिधी)महिला वाहकांनाच अधिक उत्सुकतावाहकपदी शेकडो तरुणी काम करत आहेत. एसटी घेऊन त्या दररोज शेकडो किलोमीटरचा प्रवास करत आहेत. मात्र, चालक पुरुष असल्याने अनेकदा गैरसोयच होत आहे. तरीही त्या कर्तव्य बजावत आहेत. महिला वाहक भरती झाल्यास चांगले सूर जुळतील, अशा भावना अनेक महिला वाहकांनी ‘लोकमत’शी‘ बोलताना व्यक्त केल्या.