शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास प्रकाश पाटील आपली कार घेऊन नगरपंचायतीच्या समोरील मुख्य रस्त्यावरून जात होते. नगरपंचायत इमारतीसमोर दुतर्फा लावलेल्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे पाटील यांनी नगरपंचायतीच्या कार्यालयात जाऊन आरडाओरडा केला. याच वेळी नगराध्यक्ष जानवेकर हे आपली कार घेऊन आले. वाहतूक कोंडीमुळे त्यांनाही कार्यालयाकडे जाण्यासाठी रस्ता मिळेना. नगराध्यक्ष जानवेकर यांनी स्वत: चालत जाऊन रस्त्यामध्ये कार लावलेल्या प्रकाश पाटील यांना कार बाजूला घेण्याची विनंती केली; त्यावेळी पाटील यांनी अर्वाच्च शिवीगाळ करून कार बाजूला घेणार नाही, अशी भूमिका घेतली आणि शिवीगाळ सुरूच ठेवली. याप्रसंगी राग सहन न झाल्याने नगराध्यक्षांनी थेट त्याच्या कानाखाली लगावली. त्यामुळे संतप्त झालेल्या पाटील यांनीही नगराध्यक्षांची कॉलर धरत त्यांना मारहाण केली. काहीजणांनी दोघांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला. मात्र बराच वेळ दोन्ही बाजूंनी अश्लील शिवीगाळ सुरूच होती. यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. अखेरीस हे प्रकरण पोलीस ठाण्यात गेल्यानंतर त्यावर पडदा टाकण्यात आला.
हातकणंगले नगराध्यक्ष आणि एकात हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:24 IST
शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास प्रकाश पाटील आपली कार घेऊन नगरपंचायतीच्या समोरील मुख्य रस्त्यावरून जात होते. नगरपंचायत इमारतीसमोर दुतर्फा लावलेल्या ...
हातकणंगले नगराध्यक्ष आणि एकात हाणामारी
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}