शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

हातकणंगले सभापती निवड चिठ्ठीद्वारे

By admin | Updated: March 9, 2017 00:02 IST

समान बलाबल : रेश्मा सनदी, मेहरनिगा जमादार यांच्यात लढत

आयुब मुल्ला --खोची--खोची : हातकणंगले पंचायत समिती सभापती निवडीचा निर्णय हा अपक्ष सदस्यांवर अवलंबून आहे. भाजप-जनसुराज्यने ११ सदस्यांपर्यंतचा आकडा गाठला आहे. त्यांना एका सदस्याची गरज आहे. तर भाजप-जनसुराज्यला सत्तेपासून रोखण्यासाठी विरोधकांनी आपली एकी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सत्तेसाठी दोघांनाही एका मताची गरज पडणार आहे. अशावेळी चिठ्ठीद्वारे निवडप्रक्रिया होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तालुक्याचा सभापती चिठ्ठीतूनच निश्चित होईल. तालुक्यात २२ पंचायत समिती सदस्य आहेत. निवडणुकीसाठी भाजप-जनसुराज्यने युती केली होती. सर्वाधिक सहा जागा भाजपने जिंकल्या. जनसुराज्यचा पाच जागांवर विजय झाला. आवाडे गटाच्या म्हणजे कोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडीच्या पाच, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दोन, शिवसेना दोन, कॉँग्रेस एक, असे उमेदवार विजयी झाले. त्यांचे एकूण संख्याबळ दहा होते. तर एक अपक्ष सदस्यही त्यांच्या ऐक्यात सहभागी होणार आहे. त्यामुळे एकमेकांचे संख्याबळ प्रत्येकी ११ होते. दोघांनाही एका मताची गरज आहे. पण, सद्य:स्थितीत असेच संख्याबळ राहणार आहे. त्यामुळे चिठ्ठीद्वारे निवड हाच प्रधान मुद्दा बनला आहे. सभापतिपद ओबीसी महिला वर्गासाठी आरक्षित आहे. यामध्ये भाजपच्या कबनूर पूर्वमधून रेश्मा सनदी, हुपरी उत्तरमधून वैजयंती आंबी विजयी झालेल्या उमेदवार सभापतिपदाच्या दावेदार आहेत. तर विरोधी गटाकडून हेर्लेमधून अपक्ष निवडून आलेल्या मेहरनिगा जमादार या दावेदार समजल्या जातात. बहुमत असलेल्या भाजप-जनसुराज्यला सत्ता स्थापन करण्याची संधी आहे. पण, त्यांना अपक्ष सदस्यांची गरज आहे; परंतु अपक्ष सदस्य संघटना, शिवसेना यांच्याबरोबर विजयी झाली आहे. त्यामुळे त्यांना या सर्वांबरोबरच राहावे लागणार आहे. त्यातच त्यांना सभापतिपदाची उमेदवारी यांच्याकडून मिळणार आहे. त्यामुळे सर्वाधिक हित येथेच आहे. या सर्वांमुळे दोन्ही बाजूंकडे संख्याबळ समान म्हणजे प्रत्येकी ११ राहणार आहे. अशा परिस्थितीत चिठ्ठीद्वारेच तालुक्याचा सभापती निश्चित होणार आहे.भाजपच्या रेश्मा सनदी या दुसऱ्यांदा विजयी झाल्या आहेत. आमदार हाळवणकर यांच्या त्या समर्थक आहेत. त्यामुळे सभापतिपदासाठी भाजपकडून त्यांचे नाव आघाडीवर आहे. तर आवाडे गट, संघटना, शिवसेना, कॉँग्रेस यांच्या ऐक्यातून अपक्ष मेहरनिगा जमादार यांचे नाव निश्चित आहे. त्यामुळे रेश्मा सनदी व महेरनिगा जमादार यांच्यात सभापतिपदाची लढाई होणार हे मात्र स्पष्ट आहे.