शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

सागरच्या कर्तृत्वाला दातृत्वाचा हात

By admin | Updated: August 3, 2014 01:47 IST

‘वुई केअर-२४’ ग्रुप : २० हजारांची मदत; ‘लोकमत’च्या वृत्ताला ‘सोशल मीडिया’ची साथ

कोल्हापूर : सोशल मीडियाच्या गैरवापराबाबत तक्रारीचा सूर असताना याच सोशल मीडियाद्वारे समाजातील गरजू, गरीब आणि निराधारांना मदतीचा हात मिळवून दिला जाऊ शकतो याचा प्रत्यय कोल्हापुरातीलच ‘वुई केअर-२४’ या व्हॉटस अ‍ॅप ग्रुपने दाखवून दिला आहे. ‘लोकमत’च्या हॅलो कोल्हापूर पान १ वर शुक्रवारी ‘सागरला हवाय मदतीचा हात’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाले होते. सागर शहाजी वीर या निराधार तरुणाच्या महत्त्वाकांक्षेला बळ देणारे आणि त्याला मदत मिळवून देण्यासाठी असलेले हे वृत्त ‘वुई केअर-२४’ या ग्रुपचे सदस्य मिलिंद धोंड यांनी व्हॉटस अ‍ॅपच्या माध्यमातून आपल्या ग्रुपला शेअर केले. त्यानंतर त्यांनी ग्रुपला मदतीसाठी आवाहन केले. अवघ्या काही मिनिटांतच वीस हजार रुपयांची आर्थिक मदत गोळा केली. एवढेच नाही, तर त्यांनी ‘एनजीओ कम्पँसिएशन-२४’ या ग्रुपतर्फे सागरच्या अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाचा दोन वर्षांचा खर्चही उचलला. दहावीच्या परीक्षेत ८२ टक्के गुण मिळविलेल्या सागर याला अभियांत्रिकी क्षेत्रात करियर करायचे होते; पण आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने त्याचे शिक्षण घेण्याची इच्छा पूर्ण होईल की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यावेळी डॉ. बापूजी साळुंखे अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापकांनी त्याला मदतीचा हात पुढे केला; पण तरीही आर्थिक गरज होती. त्यामुळे पुन्हा एकदा त्याच्या इच्छेला मुरड घालावी लागणार होती. यावेळी ‘लोकमत’ त्याच्या मदतीला धावले. ‘वुई केअर-२४’ या ग्रुपमधील देवेंद्र दिवाण, अ‍ॅड. इंद्रजित चव्हाण, सागर बगाडे, उत्तम फराकटे, अ‍ॅड. गुंड पाटील, तुषार चोपडे, संदीप नष्टे, राकेश अंदानी, गौरी शिरोडकर, ऋषिकेश खोत, श्याम नोटाणी, अनंत खासबागदार, विलास रेडेकर, अस्पाक आजरेकर, कुलदीप शिंगटे, अजित साळोखे, रत्नेश शिरोळकर, अमर बागी, विकास प्रभू, सुशील चंदवाणी यांनी आर्थिक मदत केली. तसेच या ग्रुपने ‘लोकमत’ कार्यालयात येऊन सागरला मदत दिली. यावेळी ‘लोकमत’चे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, संपादक वसंत भोसले यांच्यासह ‘वुई केअर-२४’ या ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते.