निम्म्या शहरात आज पाणी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:27 IST2021-09-22T04:27:26+5:302021-09-22T04:27:26+5:30

कोल्हापूर : बालिंगा अशुद्ध जल उपसा केंद्राकडील पंपाची डिलिव्हरी लाईन मेन रायझिंग लाईनला जोडण्याचे काम गुरूवारी करण्यात येणार असल्यामुळे ...

Half the city has no water today | निम्म्या शहरात आज पाणी नाही

निम्म्या शहरात आज पाणी नाही

कोल्हापूर : बालिंगा अशुद्ध जल उपसा केंद्राकडील पंपाची डिलिव्हरी लाईन मेन रायझिंग लाईनला जोडण्याचे काम गुरूवारी करण्यात येणार असल्यामुळे बालिंगा जलशुद्धीकरण केंद्राकडील पाणी उपसा बंद राहणार आहे. परिणामी चंबुखडी व आपटेनगर टाकीवर अवलंबून असलेल्या भागास पाणी पुरवठा होणार नाही, तर शुक्रवारी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.

बालिंगा अशुद्ध जल उपसा केंद्राकडील नवीन बसविण्यात आलेल्या ३०० एचपी व्हर्टिकल टर्बाईन पंपाची डिलिव्हरी लाईन मेन रायझिंग लाईनला जोडण्यात येणार आहे. त्याकरिता गुरुवारी बालिंगा व नागदेववाडी अशुद्ध - शुद्ध जल उपसा केंद्राकडील पाणी उपसा बंद ठेवावा लागणार आहे.

नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून या भागात टँकरद्वारे पाणी वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून सहकार्य करावे, असे आवाहन पाणी पुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे.

या भागात पाणी पुरवठा बंद राहणार -

१. ए, बी, वॉर्ड : संलग्नित उपनगरे, ग्रामीण भाग व शहराअंतर्गत येणाऱ्या लक्षतीर्थ वसाहत, संपूर्ण फुलेवाडी रिंगरोड,सानेगुरूजी वसाहत, राजे संभाजी , क्रशर चौक आपटेनगर टाकी, राजोपाध्येनगर, कणेरकरनगर, क्रांतिसिंह नाना पाटील नगर, तुळजाभवानी कॉलनी, देवकर पाणंद, टेंभे रोड , शिवाजी पेठ ,चंद्रेश्वरगल्ली , तटाकडील तालीम, साकोली कॉर्नर, उभा मारुती चौक , बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड , मंगळवार पेठ

२. सी डी वॉर्ड : दुधाळी परिसर, गंगावेश , उत्तरेश्वर पेठ , शुक्रवार पेठ, ब्रम्हपुरी, बुधवार पेठ तालीम, सिध्दार्थनगर, पापाची तिकटी, लक्ष्मीपुरी, शनिवार पेठ चौक, सोमवार पेठ, ट्रेझरी ऑफिसर, बिंदूचौक, कॉमर्स कॉलेज, आझाद चौक, उमा टॉकीज,महालक्ष्मी मंदिर, गुजरी, मिरजकर तिकटी, देवल क्लब.

३. ई वॉर्ड : खानविलकर पेट्रोल पंप, शाहूपुरी ५, ६, ७ व ८ वी गल्ली, कुंभार गल्ली व बागल चौक.

Web Title: Half the city has no water today