हुपरीत विषय समितीच्यांवर गाट गटाचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:26 AM2021-01-23T04:26:15+5:302021-01-23T04:26:15+5:30

दरम्यान, आजच्या विषय समिती निवडीमध्ये स्थायी समिती सभापती नगराध्यक्षा जयश्री महावीर गाट, स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य समिती सभापतिपदी भरत ...

Gut group dominates the Hupari subject committee | हुपरीत विषय समितीच्यांवर गाट गटाचे वर्चस्व

हुपरीत विषय समितीच्यांवर गाट गटाचे वर्चस्व

Next

दरम्यान, आजच्या विषय समिती निवडीमध्ये स्थायी समिती सभापती नगराध्यक्षा जयश्री महावीर गाट, स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य समिती सभापतिपदी भरत आण्णासो लठ्ठे ,पाणीपुरवठा समिती सभापतिपदी रफिक हारूण मुल्ला, महिला व बालकल्याण समिती सभापती पदी लक्ष्मी राजेंद्र साळोखे(सर्व भाजप)तसेच बांधकाम समिती सभापतिपदी कोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडीच्या रेवती मनोज पाटील यांच्या बिनविरोध निवडी करण्यात आल्या.

नगरपरिषदेवर भाजपचे महावीर गाट व आमदार प्रकाश आवाडे यांची सत्ता आहे. उपनगराध्यक्ष व पक्षप्रतोद पदाच्या राजीनाम्याच्या कारणावरून गट नेते महावीर गाट व उपनगराध्यक्ष भरत लठ्ठे यांच्या मध्ये वितुष्ट निर्माण झाले आहे. लठ्ठे यांनी आपल्याकडे असलेले पक्षप्रतोद पदाच्या जोरावर विरोधी गटाच्या पाच नगरसेवकांना सोबत घेऊन आजच्या सर्व विषय समित्यावर आपला कब्जा मिळविण्याचा प्रयत्न चालविला होता. मात्र, महावीर गाट यांनी वरिष्ठ पदाधिकारी व नेत्यांना आपलेसे करत व आमदार प्रकाश आवाडे यांच्याशी असलेल्या संबंधाच्या बळावर सर्व समित्यांवर वर्चस्व मिळवले. स्थायी समिती सभापती नगराध्यक्षा जयश्री महावीर गाट, सदस्य भरत आण्णासो लठ्ठे, रफिक हारूण मुल्ला, रेवती मनोज पाटील, लक्ष्मी राजेंद्र साळोखे, जयकुमार मंगलराव माळगे, बांधकाम समिती सभापती रेवती मनोज पाटील, सदस्य ऋतुजा अभिनव गोंधळी, सुप्रिया श्रीनिवास पालकर, अमर डिकाप्पा गजरे, स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य समिती सभापती भरत आण्णासो लठ्ठे, सदस्य

सुप्रिया श्रीनिवास पालकर, राजाभाऊ पांडुरंग वाईंगडे, दौलतराव धनाजीराव पाटील, पाणीपुरवठा व जलनि:स्सारण समिती सभापती रफिक हारूण मुल्ला, अनिता शशिकांत मधाळे, शीतल किरण कांबळे, बाळासाहेब सिधु मुधाळे, महिला व बालकल्याण समिती सभापती लक्ष्मी राजेंद्र

साळोखे, माया सूर्यकांत रावण, अनिता शशिकांत

मधाळे, पूनम राजेंद्र पाटील.

-------::------- टीप -फोटो पाठवित आहे.

Web Title: Gut group dominates the Hupari subject committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.