कळंबा गोळीबार प्रकरणातील बंदूक जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:28 IST2021-09-22T04:28:08+5:302021-09-22T04:28:08+5:30

कोल्हापूर : कळंबा (ता. करवीर) येथे माय-लेकीवर केलेल्या गोळीबार प्रकरणातील बंदूक संशयित आरोपींकडून करवीर पोलिसांनी मंगळवारी जप्त केली. अटक ...

Guns seized in Kalamba shooting case | कळंबा गोळीबार प्रकरणातील बंदूक जप्त

कळंबा गोळीबार प्रकरणातील बंदूक जप्त

कोल्हापूर : कळंबा (ता. करवीर) येथे माय-लेकीवर केलेल्या गोळीबार प्रकरणातील बंदूक संशयित आरोपींकडून करवीर पोलिसांनी मंगळवारी जप्त केली. अटक केलेला संशयित आरोपी ऋषिकेश बाबूराव कोळी (वय ३०, रा. मगदूम कॉलनी, पाचगाव, ता. करवीर) याच्या पोलीस कोठडीत उद्या, गुरुवारपर्यंत वाढ करण्यात आली.

पाचगाव येथील मगदूम कॉलनीतील ऋषिकेश कोळी या विवाहित तरुणाला शुक्रवारी सकाळी एका तरुणीने मोबाईलवर मेसेज पाठवला. त्यावरुन तरुणाची पत्नी अर्चना कोळी यांची मेसेज पाठवणाऱ्या तरुणी व तिच्या आईशी कळंबा तलाव परिसरात वादावादी झाली. त्यावेळी रागातच ऋषिकेश कोळी याने छर्ऱ्याच्या बंदुकीने गोळीबार केला. त्यात छर्रे लागल्याने तरुणी व तिची आई दोघीही जखमी झाल्या. या गोळीबार प्रकरणावरून करवीर पोलिसांनी ऋषिकेश कोळी व त्याची पत्नी अर्चना कोळी यांना अटक करुन पोलीस कोठडी दिली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना मंगळवारी पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्यांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली. दरम्यान, संशयिताने गुन्ह्यात प्रत्यक्ष वापरलेली बंदूक करवीर पोलिसांनी मंगळवारी जप्त केली.

फोटो नं. २१०९२०२१-कोल-कळंबा गोळीबार

ओळ : कळंबा (ता. करवीर) येथे चार दिवसांपूर्वी झालेल्या गोळीबार प्रकरणात संशयितांनी गुन्ह्यात प्रत्यक्ष वापरलेली बंदूक करवीर पोलिसांनी मंगळवारी जप्त केली.

210921\21kol_6_21092021_5.jpg

ओळ : कळंबा (ता. करवीर) येथे चार दिवसापूर्वी झालेल्या गोळीबार प्रकरणात संशयीतानी गुन्ह्यात प्रत्येक्ष वापरलेली बंदूक करवीर पोलिसांनी मंगळवारी जप्त केली.

Web Title: Guns seized in Kalamba shooting case