शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यस्थीच्या आडून ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
2
Latest Marathi News LIVE Updates: पनवेल रेल्वे स्थानकात लिफ्ट कोसळली, ४ प्रवासी असल्याची माहिती
3
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
4
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
5
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
6
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
7
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
8
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
9
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
10
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
11
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
12
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
13
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
14
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
15
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
16
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
17
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
18
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
19
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
20
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
Daily Top 2Weekly Top 5

त्रुटी दूर करून जीएसटी कायदा सुटसुटीत करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जीएसटी कायदा लागू झाल्यापासून त्यामध्ये वारंवार बदल केले जात आहेत. याचा थेट परिणाम उद्योग ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : जीएसटी कायदा लागू झाल्यापासून त्यामध्ये वारंवार बदल केले जात आहेत. याचा थेट परिणाम उद्योग व व्यापाराच्या व्यवसायांवर होत आहे. त्यामुळे त्रुटी दूर करून कायदा सुटसुटीत करावा, अशी मागणी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या शिष्टमंडळाने केंद्रीय जीएसटीचे विभागीय आयुक्त विद्याधर थेटे यांच्याकडे केली.

इनपुट टॅक्स क्रेडिट नाकारणे, जीएसटी रिटर्न्सची पुनरावृत्ती करण्यास परवानगी नसणे, अवेळी अधिसूचना जारी होणे, नोंदणी रद्द करण्यासाठी अधिकाऱ्यांना अतिरिक्त अधिकार आणि आयटीसी अवरोधित करणे, पोर्टल इश्यू, प्राप्तिकर उपयोगिता वेळेवर उपलब्ध करून न देणे आणि वारंवार बदलणे, एमसीए जारी करणे. यामुळे उद्योजक आणि व्यापाऱ्यांमध्ये आर्थिक आणि मानसिक ताणतणाव वाढत आहे. मागील तीन वर्षांत मोठ्या प्रमाणावर जीएसटी कायद्यातील समस्या सोडविण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिका म्हणजे करदात्यांना येणाऱ्या समस्यांचे पुरावे आहेत. याबाबत निषेध म्हणून ऑल इंडिया टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशनने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना निवेदन देऊन केला. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीनेही आयुक्त थेटे यांना निवेदन दिले. यावेळी चेंबर ऑफ काॅमसचे अध्यक्ष संजय शेटे, मानद सचिव धनंजय दुग्गे, जयेश ओसवाल, संचालक अजित कोठारी, दीपेश गुंदेशा, अभिराम दीक्षित, गंगाधर हळदीकर व महेश जगताप यांच्यासह केंद्रीय जीएसटी विभाग, कोल्हापूरचे सहआयुक्त, राहुल गावडे उपस्थित होते.

फोटो ओळी : जीएसटी कायद्यातील त्रुटी दूर कराव्यात, या मागणीचे निवेदन कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने केंद्रीय जीएसटी विभागाचे आयुक्त विद्याधर थेटे यांना देण्यात आले. यावेळी संजय शेटे, धनंजय दुग्गे, जयेश ओसवाल, आदी उपस्थित होते. (फोटो-२९०१२०२१-कोल- जीएसटी)