नानासाहेब कोरे यांच्या २१ व्या स्मृतिदिनी अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:27 IST2021-08-26T04:27:30+5:302021-08-26T04:27:30+5:30

कै. नानासाहेब कोरे यांच्या २१ व्या स्मृतिदिनी अभिवादन - लोकमत न्यूज नेटवर्क वारणानगर - येथील वारणा दूध संघाचे माजी ...

Greetings on the 21st Memorial Day of Nanasaheb Kore | नानासाहेब कोरे यांच्या २१ व्या स्मृतिदिनी अभिवादन

नानासाहेब कोरे यांच्या २१ व्या स्मृतिदिनी अभिवादन

कै. नानासाहेब कोरे यांच्या २१ व्या स्मृतिदिनी अभिवादन -

लोकमत न्यूज नेटवर्क

वारणानगर - येथील वारणा दूध संघाचे माजी अध्यक्ष, स्वर्गीय नानासाहेब कोरे यांचा २१ वा स्मृतिदिन बुधवारी साजरा झाला.

तात्यासाहेब कोरेनगर येथील वारणा दूध संघाच्या कार्यस्थळावर स्वर्गीय नानासाहेब कोरे यांच्या समाधीस्थळ व प्रतिमेचे विधीवत पूजन त्यांचे चिरंजीव डॉ. विजय कोरे सपत्नीक यांच्याहस्ते झाले. संघाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे व कोरे कुटुंबीय यांच्यासह मान्यवर, पदाधिकारी यांनी नानासाहेबांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन अभिवादन केले.

यावेळी संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव, कार्यकारी संचालक मोहन येडूरकर, बँकेचे ज्येष्ठ संचालक प्रमोदराव कोरे, डॉ. सदाशिव चौगुले, श्रीधर चौगुले, कोरे कुटुंबीय आणि संघाचे संचालक शिवाजीराव जंगम, माधव गुळवणी, अभिजित पाटील, शिवाजी कापरे, प्रदीप देशमुख,

राजवर्धन मोहिते, दीपक पाटील, चंद्रशेखर बुवा, शमशाद मुल्ला इतर संचालक, अधिकारी सुधीर कामेरीकर, शरद शेटे, अनिल हेर्ले, आर. व्ही. देसाई, श्रीधर बुधाले, अशोक पाटील, डॉ. नागोजी वडजे, डॉ. एन. ए. पाटील, कामगार संघटनेचे अध्यक्ष रामचंद्र जाधव, लालासोा देसाई व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

फोटो ओळी-वारणा दूध संघाच्या कार्यस्थळावर माजी अध्यक्ष स्वर्गीय नानासाहेब कोरे यांच्या २१ व्या स्मृतिदिनी समाधीस्थळी अभिवादन करताना त्यांचे चिरंजीव डॉ. विजय कोरे, संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव, कार्यकारी संचालक मोहन येडूरकर, डॉ. सदाशिव चौगुले, श्रीधर चौगुले, प्रमोदराव कोरे, संचालक व अधिकारी.

Web Title: Greetings on the 21st Memorial Day of Nanasaheb Kore