शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
5
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
6
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
7
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
8
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
9
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
10
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
11
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
12
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
13
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
14
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
15
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
16
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
17
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
18
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
19
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
20
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!

हंगर हेल्परकडून भुकेलेल्यांना घास,शहरातील चार महाविद्यालयीन युवतींचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 11:32 IST

CoronaVirus Help Kolhapur : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या कोल्हापूर शहरात अनेकांना दोन घास मिळणे अवघड झाले आहे. ते लक्षात घेऊन असेंब्ली रोड आणि नागाळा पार्कमध्ये राहणाऱ्या चार महाविद्यालयीन युवती या अशा दोनशे गरजूंना रोज अल्पोपाहार, चहा-बिस्किटे वाटप करत आहेत. स्वत:च्या पॉकेटमनी आणि त्यांच्या परिसरातील काही नागरिकांच्या आर्थिक मदतीवर हा उपक्रम त्या राबवित आहेत.

ठळक मुद्देशहरातील चार महाविद्यालयीन युवतींचा उपक्रम रोज दोनशे जणांना अल्पोपाहार, चहा वाटप

संतोष मिठारी कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या कोल्हापूर शहरात अनेकांना दोन घास मिळणे अवघड झाले आहे. ते लक्षात घेऊन असेंब्ली रोड आणि नागाळा पार्कमध्ये राहणाऱ्या चार महाविद्यालयीन युवती या अशा दोनशे गरजूंना रोज अल्पोपाहार, चहा-बिस्किटे वाटप करत आहेत. स्वत:च्या पॉकेटमनी आणि त्यांच्या परिसरातील काही नागरिकांच्या आर्थिक मदतीवर हा उपक्रम त्या राबवित आहेत.कोरोनाचा सध्याचा काळ अधिक कठीण आहे. अशा स्थितीत समाजातील गरजूंना आपल्या परीने काही मदत करण्याचा विचार असेंब्ली रोड परिसरात राहणाऱ्या नूपुर देशपांडे, श्वेता काळुगडे, दिशा मनचुडिया आणि नागाळा पार्कमध्ये राहणाऱ्या गुंजन नाडकर्णी यांच्या मनात आला. त्यांनी शहरातील गरिबांना आणि लॉकडाऊनमध्ये विविध रस्त्यांवर बंदोबस्ताला असणाऱ्या पोलिसांना अल्पोपाहार, चहा, बिस्किटे वाटप करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार रविवारपासून त्यांनी सुरुवात केली.

मध्यवर्ती बसस्थानक परिसर, रेल्वेस्थानक, स्टेशन रोड, रंकाळा तलाव, व्हिनस कॉर्नर, कसबा बावडा आदी परिसरातील पोलीस आणि गरीब अशा दोनशे जणांना कधी पोहे, कधी उप्पीट, तर पुलाव, केळी, चहा, बिस्किटांचे वाटप करत आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांचा हा मदतीचा हात अनेक भुकेलेल्यांना दोन घास देण्याचे काम करत आहे.मदतीचा हात देईल बळया उपक्रमासाठी रोज सुमारे १५०० रुपये खर्च होत आहेत. हा खर्च त्या युवती आपल्या पॉकेटमनी आणि त्या राहत असलेल्या परिसरातील काही नागरिकांनी केलेल्या आर्थिक मदतीवर करत आहेत. समाजातील दानशूर व्यक्ती, संस्थांनी मदतीचा हात दिल्यास या ह्यहंगर हेल्परह्णच्या उपक्रमाला बळ मिळेल.

मास्क, ग्लोव्हज, सॅॅॅनिटायझर, फेसशिल्डच्या वापरासह कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करून आम्ही रोज अल्पोपाहार, चहा-बिस्किटांचे वाटप करत आहोत. लॉकडाऊन संपेपर्यंत हा उपक्रम आम्ही राबविणार आहोत.-नूपुर देशपांडे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर