शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
3
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
4
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
5
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
6
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
7
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
8
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
9
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
10
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
12
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
13
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
14
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
15
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
16
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
17
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
18
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
19
ऐन निवडणुकीच्या तोंडावरच केजरीवाल यांना अटक का? सर्वोच्च न्यायालयाची ईडीला विचारणा; म्हणाले...
20
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 

ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराची पदफेऱ्यांनी झाली सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 7:05 PM

Grampanchyat Election Kolhapur-ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गेल्या दहा दिवसांपासून उडालेला जाहीर प्रचाराचा धुरळा बुधवारी सायंकाळी खाली बसला. उमेदवारांनी मोठ्या पदयात्रा काढून शक्तिप्रदर्शन केल्याने गावे निवडणूकमय झाली. आता जाहीर प्रचार संपला तरी एकेक मत निर्णायक असल्याने मतांच्या जोडणीसाठी, फोडाफाडीसाठी यंत्रणा गतिमान झाली आहे.

ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणूक प्रचाराची पदफेऱ्यांनी झाली सांगता ३८६ जागांसाठी ७ हजार ६५७ जण रिंगणात

कोल्हापूर : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गेल्या दहा दिवसांपासून उडालेला जाहीर प्रचाराचा धुरळा बुधवारी सायंकाळी खाली बसला. उमेदवारांनी मोठ्या पदयात्रा काढून शक्तिप्रदर्शन केल्याने गावे निवडणूकमय झाली. आता जाहीर प्रचार संपला तरी एकेक मत निर्णायक असल्याने मतांच्या जोडणीसाठी, फोडाफाडीसाठी यंत्रणा गतिमान झाली आहे.कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या जिल्ह्यातील ४३३ पैकी ३८६ ग्रामपंचायतींसाठी उद्या, शुक्रवारी मतदान होत आहे. ४७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. ७२० सदस्य बिनविरोध निवडून आले असून, ७ हजार ६५७ जण रिंगणात आहेत.सरपंचपदाच्या आरक्षणाशिवाय लढविल्या गेलेल्या या निवडणुकीत सर्वच प्रभाग सरपंचपदाचे गृहीत धरूनच टोकाचा संघर्ष पाहायला मिळत आहे. निवडणूक जाहीर होण्याआधीपासूनच प्रचाराने वेग घेतला; पण ४ जानेवारीला माघारीनंतर खऱ्या अर्थाने धुरळा उडाला होता.

राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी पॅटर्नसह स्वत:चाही सोईच्या आघाडीचा पॅटर्न राबवत निवडणूक प्रचंड ईर्षेने लढविली जात आहे. स्थानिक पातळीवरील गट-तट आणि त्याला कौटुंबिक संघर्ष व भाऊबंदकी यांचीही फोडणी मिळाल्याने खऱ्या अर्थाने गावच्या राजकारणाने टोक गाठले आहे. कोणत्याही बड्या नेत्यांच्या प्रचारसभांशिवाय केवळ वैयक्तिक भेटीगाठी, कोपरा सभा, एवढ्यावरच प्रचार सिमित राहिला. बड्या नेत्यांची भूमिका पॅनेल निवड आणि आर्थिक रसदीपुरती सिमित राहिली. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकkolhapurकोल्हापूर