शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

पदवी प्रथम वर्षाच्या परीक्षांचा सोमवारपासून प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:31 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने विद्यापीठाने तृतीय, द्वितीय वर्षाबरोबरच प्रथम वर्षाची परीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेतला. त्यातील पदवी प्रथम वर्षाची ...

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने विद्यापीठाने तृतीय, द्वितीय वर्षाबरोबरच प्रथम वर्षाची परीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेतला. त्यातील पदवी प्रथम वर्षाची परीक्षा घेण्याची जबाबदारी महाविद्यालयांवर सोपविण्यात आली. त्यानुसार गेल्या दोन आठवड्यांत महाविद्यालयांनी परीक्षा घेण्याची तयारी केली. ज्या महाविद्यालयांमध्ये कला, वाणिज्य, विज्ञान विद्याशाखांचे अभ्यासक्रम आहेत त्यांनी सोमवारपासून, तर एक-दोन विद्याशाखांचे अभ्यासक्रम असणाऱ्या महाविद्यालयांनी बुधवार (दि. ५ मे)पासून परीक्षा घेण्याचे नियोजन केले आहे. त्याबाबतच्या वेळापत्रकाची माहिती महाविद्यालय प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे. दरम्यान, विद्यापीठाने पदवी, पदव्युत्तर विविध २७ अभ्यासक्रमांच्या हिवाळी सत्रातील परीक्षा गुरुवारी घेतली. त्यासाठी एकूण २२७२१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २२२४५ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा दिली, तर ४६८ विद्यार्थी अनुपस्थित राहिले.

प्रतिक्रिया

विद्यापीठाने केलेल्या सूचनेनुसार महाविद्यालयांनी पदवी प्रथम वर्षाची ऑनलाईन परीक्षा घेण्याची तयारी पूर्ण केली आहे. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील बहुतांश महाविद्यालयांची परीक्षा सोमवारपासून सुरू होतील. दि. १५ मे पर्यंत या परीक्षा पूर्ण करण्याचे नियोजन महाविद्यालयांनी केले आहे.

-डॉ. व्ही. एम. पाटील, सचिव, शिवाजी विद्यापीठ प्राचार्य संघटना.

चौकट

या विद्यार्थ्यांसाठी ‘हेल्पलाईन’ असावी

विद्यापीठाने हिवाळी सत्रातील ऑनलाईन परीक्षेत विद्यार्थ्यांना काही तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास त्याबाबतच्या मदतीसाठी हेल्पलाईन आणि वॉररूम सुरू केली आहे. पदवी प्रथम वर्षाच्या परीक्षेसाठी देखील हेल्पलाईन सुरू करावी, अशी मागणी या अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांकडून होत आहे.

आकडेवारी दृष्टिक्षेपात

संलग्नित महाविद्यालये : २७६

प्रथम वर्ष विद्यार्थी संख्या : ६२८००