शासनाने काजूदर जाहीर करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:22 IST2021-05-24T04:22:15+5:302021-05-24T04:22:15+5:30

यंदाच्या हंगामात गतवर्षीप्रमाणेच काजू पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कोरोना महामारीमुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. हंगामात काजूचे उत्पादनही ...

The government should declare cashew nuts | शासनाने काजूदर जाहीर करावा

शासनाने काजूदर जाहीर करावा

यंदाच्या हंगामात गतवर्षीप्रमाणेच काजू पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कोरोना महामारीमुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. हंगामात काजूचे उत्पादनही अल्प प्रमाणात आहे. मे महिन्याचा अखेरचा आठवडाजवळ आल्याने शेतकऱ्यांना या हंगामातील काजू पिकाची उचल व दराची स्थिती पाहता काजू उत्पादकांना मोठा फटका बसला आहे.

काजू व काजूच्या दराबाबत शासनाने लक्ष घालावे व शेतकऱ्यांना चांगला दर देऊन दिलासा द्यावा अशी मागणी शेकापचे विजयभाई पाटील यांनी निवेदनातून केली आहे.

पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार व जिल्ह्यातील सर्व आमदारांना हे निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनावर शेकापचे आर. एम. गावडे, नामदेव जाधव, सुरेश पाटील, निवृती पाटील, मोहन चिमणे, नारायण कांबळे, धोंडिबा गावडे, प्रकाश पाटील, अश्विन पाटील, काजू उत्पादकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: The government should declare cashew nuts