शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

घरगुती वीज बिल माफीवर सरकार सकारात्मक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:22 IST

कोल्हापूर : लाॅकडाऊन काळातील घरगुती वीज बिलांच्या माफीसंदर्भात सरकार सकारात्मक आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी ...

कोल्हापूर : लाॅकडाऊन काळातील घरगुती वीज बिलांच्या माफीसंदर्भात सरकार सकारात्मक आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील राज्य इरिगेशन फेडरेशनच्या शिष्टमंडळाला बुधवारी दिले.

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर शेट्टी, इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील किणीकर, समीर पाटील कुंभोजकर, मुकुंद माळी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतली. चर्चेत शेट्टी यांनी शेजारील चार राज्यांनी लॉकडाऊन काळातील वीज बिलांमध्ये सवलत दिली आहे, मग आमचेच राज्य मागे का, असा प्रश्न करीत, आम्ही अजून किती दिवस आंदोलने करायची, अशी थेट विचारणा केली. राज्यभर आंदोलने केली तरीदेखील शासन गांभीर्याने पाहत नाही, याचा अर्थ काय घ्यायचा असे सांगून शेट्टी यांनी आतापर्यंत केलेली आंदोलने व सरकारकडे जनतेच्या वतीने पाठविलेल्या स्मरणपत्रांचे निवेदनच हातात दिले. घरगुती ग्राहक जास्त असल्याने सरकार पैसे नसल्याचे सांगत आहे; पण आज पैसे नाही तर काही काळानंतर महावितरणला द्या, पण जनतेला ताटकळत ठेवू नका, अशी विनंतीच शेट्टी यांनी केली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी याबाबत सरकार सकारात्मक विचार करीत आहे, असे आश्वासन दिले.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांना भेटण्यापूर्वी या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार व ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची भेट घेऊन यात लक्ष घालण्याची विनंती केली; पण या दोघाही मंत्र्यांनी हा विषय मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतील असल्याने तुम्ही त्यांच्याकडेच गाऱ्हाणे मांडा, तेच योग्य तो निर्णय घेतील, असे सांगितले.

चौकट ०१

शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन निवेदन दिले. निवेदन एन.डी. पाटील यांच्या नावाने आहे, मग त्यांच्या नावावर तुम्ही कसे काय आला आहात अशी मिश्कील विचारणा पवार यांनी केली. त्यांची प्रकृती बरी नाही, त्यांच्याच वतीने येथे आलो आहोत, असे सांगत शेट्टी व विक्रांत पाटील किणीकर यांनी एन.डी. पाटील यांच्या वयाचा मान ठेवून तरी लवकर निर्णय घ्या, असा चिमटा काढला.