शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
2
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
3
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
4
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
5
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
6
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
7
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
8
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
9
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
10
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
11
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
12
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
13
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
15
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
16
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
17
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
18
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
19
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
20
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

सभासद, शेतकऱ्यांमुळेच शाहूच्या इतिहासात सोनेरी दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:26 IST

: उच्चांकी साखर पोती पूजन सोहळा कागल : स्व. राजे विक्रमसिंह घाटगे नेहमी म्हणत असत, आपली स्पर्धा आपल्याशीच असली ...

:

उच्चांकी साखर पोती पूजन सोहळा

कागल : स्व. राजे विक्रमसिंह घाटगे नेहमी म्हणत असत, आपली स्पर्धा आपल्याशीच असली पाहिजे. त्यांचा विश्वास सार्थ ठरवित श्री छत्रपती शाहू साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात कारखान्याच्या इतिहासातील उच्चांकी उसाचे गाळप व साखर उत्पादनाचे स्वतःचे रेकॉर्ड मोडून इतिहास रचला आहे. सभासद ऊस पुरवठादार शेतकरी कामगार आणि हितचिंतक यांच्या पाठबळामुळेच कारखान्याच्या इतिहासात हा सोनेरी दिवस उजाडला आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी केले.

कारखाना कार्यस्थळावर कारखान्याच्या इतिहासातील उच्चांकी साखर पोती पूजन सोहळ्यावेळी ते बोलत होते. यावेळी दहा लाख २९ हजार १११ व्या पोत्याचे पूजन कारखान्याच्या जेष्ठ संचालिका सुहासिनीदेवी घाटगे, उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, ज्येष्ठ संचालक कर्नाटकचे माजी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील, सचांलक, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून कारखाना मानधनधारक पैलवान अनिल चव्हाण, पॉवरलिफ्टर सोनल सावंत व इंद्रजित फराकटे या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी आय. डी. कुंभार (करड्याळ), शंकर मेथे (शेंडूर ) महादेव तेलवेकर (पिंपळगाव), राजेंद्र कालेकर (कागल) या सभासदांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांनी केले. उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे यांनी आभार मानले.

आणि स्व. राजेंच्या आठवणीने सगळेच गहिवरले

कारखान्याच्या इतिहासातील हा सुवर्ण क्षण पाहण्यासाठी स्व. राजे विक्रमसिंह घाटगे हवे होते. तसेच दिवंगत संचालक, सभासद यांचे कारखान्याच्या प्रगतीमध्ये मोठे योगदान आहे. अशा भावना काही ज्येष्ठ सभासदांनी व्यक्त केल्या. यावर बोलताना समरजितसिंह घाटगे म्हणाले, स्व. राजे देहाने जरी आज आपल्यामध्ये नसले, तरी विचारांनी ते येथेच आहेत. त्यांच्या शिकवणीप्रमाणे मी कारखान्याचा अध्यक्ष म्हणून नव्हे, तर विश्वस्त म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. तुम्हा सर्व ज्येष्ठ सभासदांमध्ये मला स्व. राजेसाहेब दिसतात.

कागल येथे शाहू साखर कारखान्याच्या उच्चांकी साखर पोत्याच्या पूजनवेळी कारखान्याचे अध्यक्ष समरजित घाटगे, संचालिका श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे, वीरकुमार पाटील, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण व इतर.