शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
2
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
3
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
4
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
5
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
6
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
7
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
8
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
9
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
10
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
11
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
12
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
13
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
15
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
16
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
17
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
18
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
19
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
20
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

केरळात डाव्या पक्षांना सोने महागात पडणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तिरुवनंतपुरम : कोरोना काळात सर्वाधिक चांगले काम केल्याने केरळातील डाव्या पक्षाच्या नेतृत्वाखालील एलडीएफ सरकारची प्रतिमा देशभर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

तिरुवनंतपुरम : कोरोना काळात सर्वाधिक चांगले काम केल्याने केरळातील डाव्या पक्षाच्या नेतृत्वाखालील एलडीएफ सरकारची प्रतिमा देशभर उजळून निघाली खरी. मात्र, गतवर्षी केरळमध्ये झालेल्या सोने तस्करीचे भूत ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर डाव्या पक्षांच्या मानगुटीवर बसल्याने डाव्या पक्षांची पुरती कोंडी झाली आहे. खुद्द मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यासह मंत्रिमंडळातील तीन मंत्र्यांची नावे सोने तस्करी प्रकरणात अडकल्याने विरोधकांनी डाव्यांविरोधात रान उठविले आहे. त्यामुळे केरळ विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांनी उकरून काढलेले सोने डाव्यांना महागात पडते की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

देशातील कोरोनाचा पहिला रुग्ण केरळमध्ये आढळल्यानंतर तेथे मोठ्या संसर्गाची भीती व्यक्त झाली होती. मात्र, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या मंत्रिमंडळाने कोरोनाकाळात सर्वाधिक चांगल्या उपाययोजना करीत कोरोनाला रोखण्यात यश मिळविले होते. विशेषत: आरोग्यमंत्री के. शैलजा यांच्या कामाची तर जगभर स्तुती झाली होती. ६० लाख नागरिकांना प्रत्येकी १६०० रुपये पेन्शन, ८० लाख कुटुंबांना धान्य कीट, तर कोरोना रुग्णांवर मोफत उपचार यासारख्या अनेक सुविधा देऊन केरळमधील एलडीएफ सरकारने आपली प्रतिमा उंचावली आहे. कोरोनाकाळातील हेच काम घेऊन ते विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहे. त्यासाठी राज्यभर कॅम्पेनही चालविले जात आहे. मात्र, सोने तस्करीचा मुद्दा ऐन निवडणुकीच्या तोंडावरच विरोधकांनी उकरून काढल्याने एलडीएफ सरकार आरोपांच्या पिंजऱ्यात घेरले आहे.

शबरीमाला नव्हे...सोन्यावर बोला

शबरीमाला मंदिराच्या प्रवेशावरून केरळमध्ये डावे पक्ष आणि भाजपमध्ये सातत्याने वादाच्या ठिणग्या पडत असतात. लोकसभा निवडणुकीत तर भाजपने शबरीमाला मंदिराचा मुद्दा घेऊन राज्यभर डाव्यांविरोधात संघर्ष केला. यात हिंदूंच्या मतांमध्ये ध्रुवीकरण करण्यातही भाजप काही प्रमाणात यशस्वी ठरला. विधानसभा निवडणुकीत मात्र, भाजपने

शबरीमालापेक्षाही सोने तस्करीचा मुद्दा अधिक आक्रमकपणे उचलत डाव्यांना खिंडीत गाठले आहे. यासाठी भाजपला केंद्राकडूनही रसद दिली जात असल्याने भाजपने सोनेतस्करीच प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवली आहे.

चौकट

काय आहे प्रकरण :

५ जुलै २०२० रोजी येथील त्रिवेंद्रम विमानतळावर ३० किलो सोने शौचालयासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंमध्ये आढळले होते. यामध्ये स्वप्ना सुरेश या महिलेला अटक करण्यात आली होती. ती डाव्या लोकशाही आघाडीची निकटवर्तीय असल्याचा आरोप सातत्याने होत होता. काही दिवसांपूर्वी संबंधित महिलेने या सोने तस्करीमध्ये थेट मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यासह तीन मंत्र्यांची नावे घेतल्याने एलडीएफ सरकार अडचणीत आले आहे. विशेष म्हणजे याच सोने तस्करीच्या प्रकरणात राज्याच्या मुख्य सचिवांनाही पदावरून पायउतार व्हावे लागले आहे. संयुक्त अरब अमिरातीमधून या तस्करीचे रॅकेट चालविल्याचा आरोपही होत आहे.