शहरं
Join us  
Trending Stories
1
"निदा खानला एमआयएमनेच लपवलं!" संजय शिरसाटांचा इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप
2
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
3
तामिळनाडूत राजकीय 'दंगल'! TVK-काँग्रेस एकत्र येणं पटलं नाही; भाजपाचा पडद्यामागून 'सीक्रेट गेम'
4
Latest Marathi News LIVE Updates: "राज्यघटनेचे पालन करून ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा"
5
"IPL खेळाच, पण टीम इंडियाकडून खेळण्याचे स्वप्न पाहा"; चेतेश्वर पुजाराचा युवा खेळाडूंना सल्ला
6
Virat Kohli: १४०.४ च्या वेगानं घात केला! किंग कोहलीवर ९ वर्षांनंतर नामुष्की; असं काय घडलं?
7
Chandranath Rath : "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
8
Vastu Tips: पावसाळ्याआधी अंगणात, बिल्डिंगच्या आवारात लावा 'ही' रोपं; साप घराकडे फिरकणारसुद्धा नाहीत!
9
रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही
10
विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली...
11
महागाईचा फटका: Dabur च्या उत्पादनांच्या किमती वाढल्या; छोट्या पॅकेटचा आकारही झाला लहान
12
Iran US War: "पुन्हा पुन्हा तीच चूक कराल, तर आणखी विध्वसंक उत्तर देऊ ", इराणची अमेरिकेला धमकी
13
EXCLUSIVE: क्रिकेटमुळे लोकप्रियता झटपट मिळते, पण तो लौकिक टिकवणं महत्त्वाचं, पाया पक्का हवा!
14
केरळच्या CM पदासाठी गांधी कुटुंबाचा 'खास' माणूस?, ६३ पैकी ४७ आमदारांची पसंती, लवकरच निर्णय होणार
15
Mahua Moitra : Video - "चोर-चोर, TMC चोर"; निकालानंतर महुआ मोइत्रांना पाहून विमानात प्रवाशांची घोषणाबाजी
16
Garud Puran: मुखाग्नी केवळ मुलगाच देऊ शकतो का? गरुड पुराणात याबाबत काय लिहिलंय पाहा
17
Gold Silver Price Today: २,६०,००० रुपयांच्या पार चांदी, सोन्यातही तेजी कायम; मुंबई ते दिल्ली, पाहा काय आहे प्रमुख शहरांतील सोन्याचे दर?
18
चीनमध्ये २ माजी संरक्षण मंत्र्यांना मृत्यूदंड, 'असा' काय केला गुन्हा?, ज्यानं जिनपिंग भडकले
19
रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... 
20
HDFC Bankच्या ५५ महिन्यांच्या FD योजनेत ₹५५,००० गुंतवल्यास किती मिळेल परतावा? जाणून घ्या सविस्तर गणित
Daily Top 2Weekly Top 5

रायगडावर सापडली सोन्याची बांगडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : रायगड प्राधिकरणामार्फत दुर्गराज रायगडावर सुरू असलेल्या उत्खननात जगदीश्वराच्या मंदिराच्या बाजूला दोन दिवसांपूर्वी सोन्याची बांगडी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : रायगड प्राधिकरणामार्फत दुर्गराज रायगडावर सुरू असलेल्या उत्खननात जगदीश्वराच्या मंदिराच्या बाजूला दोन दिवसांपूर्वी सोन्याची बांगडी सापडली आहे. या बांगडीवर सुरेख नक्षीकाम असून, गडावर अशाप्रकारचा दागिना सापडणे ही फार मोठी गोष्ट असून, ती किती वर्षे जुनी आहे, यावर संशोधन झाले पाहिजे, असे मत खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केले.

दुर्गराज रायगडावर प्राधिकरणामार्फत आतापर्यंत झालेल्या उत्खननामध्ये भांडी, नाणी, घरांची वेगवेगळ्या प्रकारची कौलं अशा वस्तू मिळाल्या आहेत. मात्र, दोन दिवसांपूर्वी झालेल्या उत्खननामध्ये सोन्याची मौल्यवान बांगडी मिळाली आहे. अशाप्रकारे पुढेही अनेक ऐतिहासिक वस्तूंसह वेगवेगळे अलंकारही उत्खननात मिळू शकतात. यामुळे गडावरील तत्कालीन राहणीमान, संस्कृती, वास्तूरचना नव्याने समजण्यास मदत होणार आहे. तसेच या वस्तू ज्याठिकाणी मिळतात, त्यावरून त्या ठिकाणाचे वास्तविक ऐतिहासिक महत्त्व व माहिती समजण्यासही मोलाची मदत होणार आहे.

शुक्रवारी खासदार संभाजीराजे यांनी रायगडाला भेट देऊन उत्खननात मिळालेल्या ऐतिहासिक वस्तूंची पाहणी केली. यावेळी पुरातत्व विभागाने केलेल्या या कामगिरीबद्दल त्यांचे विशेष कौतुक केले.

----------------------------------------

बांगडी अलिकडच्या काळातील

बांगडीबाबत इतिहासतज्ज्ञ व ज्येष्ठ सराफांना विचारले असता, त्यांनी बांगडीवरील हे सुरेख नक्षीकाम अलिकडच्या काळातील आहे. ही बांगडी म्हणजे लेसर कटिंगचा प्रकार असून, ती पूर्वी गुजरात-राजस्थानमध्ये घडवली जायची, आता महाराष्ट्रातही बनवली जाते. त्यामुळे ही बांगडी फार तर ५० वर्षांपूर्वींची असू शकेल, असे बांगडीच्या छायाचित्रावरून तरी दिसते. पण बांगडी नक्की कोणत्या काळातील आहे, हे कळण्यासाठी त्यावर संशोधन झाले पाहिजे, असे मत व्यक्त केले.

---------------------------

उत्खनन जलदगतीने व्हावे

रायगडावर ३५० वास्तू आहेत. सध्या दहा ठिकाणी उत्खनन सुरू असून, या गतीने उत्खनन झाल्यास २५ वर्षे लागतील. त्यामुळे रायगड प्राधिकरणची टीम व पुरातत्व खाते या दोघांनी मिळून उत्खनन केल्यास पुढील सात-आठ वर्षांत हे काम पूर्ण होईल, असे मत खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केले.

------------------------

फोटो : ०२कोल्हापूर ०८ व ०९

दोन दिवसांपूर्वी झालेल्या रायगडावरील उत्खननादरम्यान सोन्याची बांगडी सापडली आहे.

---