शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’चा ‘गोकुळ’चा अंदाजही तंतोतंत खरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत सत्तारूढ आघाडीने सत्तेचा दावा केला असला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत सत्तारूढ आघाडीने सत्तेचा दावा केला असला तरी, विरोधकांचीच सरशी होणार असल्याचे ’लोकमत’ने मतदानानंतर सोमवारच्या अंकात अगदी स्पष्टपणे जाहीर करून गोकुळ दूध संघाचा निकाल काय लागेल, याचा अंदाज वर्तवला होता. तो निकालानंतर तंतोतंत खरा ठरला आहे.

निवडणूक लोकसभेची असो, विधानसभेची असो, की जिल्हा परिषद, महापालिकेची असो; गेल्या दहा वर्षात ‘लोकमत’ने कोणत्याही निवडणुकीचे अंदाज निकालाच्या आधीच वर्तवले आहेत आणि ते तंतोतंत खरे ठरले आहेत. ‘लोकमत’ने २००९ च्या लोकसभा निवडणुकीत मंडलिक-शेट्टी विजयी होणार, असे महिनाभर अगोदर जाहीर केले होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतही निकालापूर्वीच धनंजय महाडिक-शेट्टी विजयी होणार, असा अंदाज वर्तवला होता. त्यानंतर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे सहा आमदार विजयी होणार असल्याचे जाहीर केले होते, निकालही तसाच लागला. विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत दहा मतदार संघात कोण-कोण विजयी होणार, त्यांची नावेच ‘लोकमत’ने प्रसिध्द केली. निकालही अगदी तंतोतंत तसाच लागला.

गोकुळच्या निवडणुकीत पहिल्या दिवसापासून वार्तांकनात ‘लोकमत’ सर्वात पुढे राहिला. या निवडणुकीतील निर्णायक ठरू शकणाऱ्या घडामोडी ‘लोकमत’ने अगोदर दिल्या. त्यानुसारच निकालाचा कलही दिला. क्रॉस व्होटिंग झाले नाही, तर संघात सत्तांतर होणार असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने सोमवारीच दिले होते. त्यानुसारच संघाच्या निवडणुकीचा निकाल लागला आहे.