शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

नेत्यांविनाच बुधवारी होणार ‘गोकुळ’ची सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी (दि. ३) ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी (दि. ३) ज्येेष्ठ संचालक अरुण नरके यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. महापूर व त्यानंतर कोरोनाच्या संकटात दूध उत्पादकांना आधार दिल्याचे संघ व्यवस्थापनाचे म्हणणे आहे तर आर्थिक वर्षात झालेल्या जादा खर्चावर विरोधक आक्रमक होणार आहेत.

‘गोकुळ’चे अध्यक्ष रवींद्र आपटे हे आजारी असल्याने ते सभेला उपस्थित राहणार नाहीत. ते मोबाईलद्वारे संस्थाचालकांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे संचालक मंडळातील सर्वात ज्येष्ठ संचालक म्हणून अरुण नरके यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारची सभा होणार आहे. महापूर व त्यानंतर आलेल्या कोरोनाच्या संकटात ‘गोकुळ’ने दूध उत्पादकांना सावरण्याचे काम केले आहे. त्याचबरोबर सुविधांबाबतही व्यवस्थापन सभेत आपली बाजू मांडणार आहे. विरोधक जादा झालेल्या खर्चाचा मुद्दा घेऊन आक्रमक होणार आहे.

मागील सभेत मल्टिस्टेटचा मुद्दा असल्याने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक यांच्यासह विरोधी गटाचे नेते झाडून उपस्थित होते. मात्र, या सभेला हे नेते उपस्थित राहण्याची शक्यता कमी असली तरी गेली महिनाभर विरोधकांनी सभेची तयारी केली असल्याने जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे.

सतेज पाटील अनुपस्थित राहणार

मागील दोन सर्वसाधारण सभेला पालकमंत्री सतेज पाटील हे स्वत: उपस्थित राहिल्याने विरोध गटाला ताकद मिळाली होती. मात्र, यावेळेला मंत्री पाटील हे परदेशात असल्याने सभेला ते उपस्थित राहण्याची शक्यता धूसर आहे.

वीस वर्षांनंतर नरकेंना संधी

अरुण नरके हे १९९० ते २००० या कालावधीत ‘गोकुळ’चे अध्यक्ष राहिले. वीस वर्षांनंतर त्यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा सभा होत आहे. विशेष म्हणजे ‘गोकुळ’ची आगामी निवडणूक ते लढविणार नसल्याने ही सभा त्यांची शेवटची ठरणार आहे.